दिवाळीत प्रदूषण दिसणार्‍या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांना लोकांनी म्हटले ‘ढोंगी’ !

सिडनीतील अभिनेत्रीचा नववर्षाचा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये संताप !

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि पती झहीर इक्बाल

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि त्यांचे पती झहीर इक्बाल यांनी ऑस्ट्रेलियात ख्रिस्ताब्द नवीन वर्ष साजरे केले. ३१ डिसेंबर २०२४ या दिवशी या जोडप्याने त्यांच्या इन्स्टाग्राम खात्याद्वारे सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारी एक व्हिडिओ पोस्ट प्रसारित केली. त्यामध्ये दोघांच्या पाठीमागे आकाशात अनेक फटाके फोडले जात असल्याकडे अनेक लोकांनी लक्ष वेधले. तसेच सोनाक्षी यांना ‘ढोंगी’ म्हटले; कारण दिवाळीच्या कालावधीत प्रदूषण होत असल्याची एक पोस्ट सोनाक्षी सिन्हा यांनी प्रसारित केली होती.

इन्स्टाग्रामवरील एका वापरकर्त्याने सोनाक्षी यांच्यावर टीका करतांना लिहिले की, ‘चित्रपट कलाकारांसाठी फटाक्यांमुळे केवळ दिवाळीत प्रदूषण होते. नवीन वर्षात फटाक्यांमधून प्राणवायू (ऑक्सिजन) सोडला जातो !’