जय महाराष्ट्र वाहिनीवरील ‘तोकडी भक्ती नको’ या विषयावरील चर्चासत्रातून पुरोगाम्यांचा थयथयाट !

अंबाबाई मंदिर देवस्थान समितीने घेतलेला हा निर्णय भाजपचे ब्रीद वाक्य ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘महिलांसाठी अच्छे दिन येणार’ याला हरताळ फासण्याचे काम करत आहेत. हा निर्णय १० ऑक्टोरबरच्या पूर्वी मागे न घेतल्यास आम्ही कोल्हापूर येथे जाऊन अध्यक्षांना चोप देणार आहोत

वेब सिरीजचा तरुण पिढीवर वाईट परिणाम !

सेन्सॉरशिप नसल्यामुळे ‘वेब सिरीज’ मूळ रूपात प्रक्षेपित होतात. काही सिरीज अश्‍लील संवाद आणि हिंसक प्रसंग यांनी भरलेल्या असतात, असा दावा अधिवक्त्या दिव्या गोंटिया यांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठातील जनहित याचिकेत करण्यात आला आहे.

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन शास्त्रोक्त करण्याविषयीच्या प्रबोधन मोहिमेची ‘हेकेखोरपणा’ संबोधून हेटाळणी !

हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कशा पद्धतीने करावे, याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रतिवर्षी वैध मार्गाने प्रबोधन मोहीम राबवण्यात येते.

‘जय महाराष्ट्र’ या मराठी वृत्तवाहिनीवरील ‘राजमंत्र’ या कार्यक्रमात प्रख्यात ज्योतिषी पंडित राजकुमार शर्मा यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी केलेल्या भविष्यकथनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

डॉ. जयंत आठवले यांच्यासारख्या व्यक्तींना मी माझ्या परिभाषेत संत मानतो. प्रेक्षकांनी त्यांचा चेहरा काळजीपूर्वक आणि निरखून पहावा. डॉ. जयंत आठवले यांच्या चेहर्‍याकडे पाहिल्यानंतर ते पुष्कळ सात्त्विक असल्याचे जाणवते.

जातीद्वेष पसरवणारी वक्तव्ये पुन्हा केल्यास ब्राह्मण महासंघ आक्रमक पवित्रा घेणार !

‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवर झालेल्या एका चर्चेत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांना उद्देशून ‘भटुकड्यांनो, मनुवाद्यांनो, हरामखोरांनो’ असे जातीय विद्वेष पसरवणारे अवमानास्पद शब्द वापरले.

बेताल आणि हिंसक वक्तव्ये करणार्‍या निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवर २२ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या संदर्भात आयोजित केलेल्या चर्चासत्रात हिंदुत्वविरोधी विचारसरणीचे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी चर्चासत्रात सहभागी असलेले हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांच्याविषयी अर्वाच्च भाषा वापरली.

संपादक आशिष जाधव यांनी ‘ब्राह्मण्यवाद’ या विषयावरील बोलणे पूर्ण करू न दिल्याने अधिवक्ता संजीव पुनाळेकर चर्चासत्रातून उठून गेले

‘जय महाराष्ट्र’ या वाहिनीवर ‘४ खून, ३ राज्ये आणि सनातन ?’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. यात सनातन संस्थेच्या अनुषंगाने चर्चा चालू असतांना माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी सनातन संस्थेवर बेछूट आणि अत्यंत हीन शब्दांमध्ये आरोप केले.

वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात महिला अधिवक्त्यांना मारहाण

मुसलमानांच्या तोंडी तलाक प्रकरणावर ‘झी न्यूज हिंदुस्थान’ या हिंदी वृत्तवाहिनीवर चर्चासत्र चालू असतांना मौलवी एजाज अर्शद कासमी यांनी संतप्त होऊन महिला अधिवक्त्या फराह फैज यांना मारहाण केली.

महिलांचे अधिकारच वाळीत !

एक प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘दूरचित्रवाहिनीवर लाखो लोकांसमक्ष मौलाना असे वागत असतील, तर एरव्ही त्यांचे वर्तन कसे असेल ?’, याचा विचारच न केलेला बरा.

वेदमंत्र म्हणण्यास सांगितले; म्हणून एखाद्याला रोखणे, ही असहिष्णुता ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

मंत्रांचा संबंध वायूतत्त्वाशी आहे. संगीतातील विविध रागांमुळे पर्जन्यवृष्टी होते, असे आपण मानतो. मंत्रांमध्ये शक्ती आहे, अशी भारतियांची श्रद्धा आहे. सरकारने वेदमंत्र म्हणण्यासाठी व्यय करावा अथवा करू नये, हा वेगळा प्रश्‍न आहे; परंतु ‘वेदमंत्र म्हणा’, असे सांगणे हा कायद्याने गुन्हा नाही.


Multi Language |Offline reading | PDF