साकेत महायज्ञात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक !

रुद्राभिषेक करतांना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाशी – पावणे येथील गामी मैदानात ‘सद़्‍गुरु फाऊंडेशन’च्‍या वतीने आयोजित साकेत महायज्ञाला भक्‍तांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा महायज्ञ १५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यज्ञात सहभाग घेतला आणि रुद्राभिषेकासह हवनात आहुती दिली. या वेळी सद़्‍गुरु श्री दयालजी, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई मनपा आयुक्‍त डॉ. कैलास शिंदे आणि अन्‍य मान्‍यवर उपस्‍थित होते.

महायज्ञात देश-विदेशातून सहस्रो भक्‍त सहभागी होत आहेत. यज्ञ परिक्रमेमुळे आध्‍यात्‍मिक लाभ तर होतोच, तसेच संकटांवर मात करण्‍याची शक्‍तीही मिळते, असे भाविकांचे म्‍हणणे आहे. महायज्ञात दररोज विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. यज्ञात सहभागी होणार्‍या भक्‍तांसाठी महाप्रसादाची विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

सद़्‍गुरु श्री दयालजी म्‍हणाले, ‘‘साकेत महायज्ञाचा उद्देश समाजात सुख, शांती आणि समृद्धी निर्माण करणे हा आहे.’’