‘बिग बॉस’मधून मनोरंजन नाही, तर केवळ मानसिक त्रास होतो  ! – अभिनेत्री शमिता शेट्टी  

‘बिग बॉस’मध्ये भांडणे, मारामारी, राजकारण आणि अश्‍लील भाषेत केलेले संभाषण पहायला मिळते !

  • असे कार्यक्रम भारतात प्रसारित होतात आणि कोट्यवधी लोक ते पहातात; मात्र  काही ठरावीक समाजप्रेमी वगळले, तर कुणीही त्याचा विरोध करत नाही, हे भारतियांना लज्जास्पद !
  • अशा कार्यक्रमांचे प्रसारण करणे, हे समाजाला घातक आहे. सरकारकडून अशा कार्यक्रमांवर बंदी घालणे अपेक्षित आहे !
अभिनेत्री शमिता शेट्टी

मुंबई – ‘बिग बॉस’ हा अत्यंत त्रासदायक कार्यक्रम आहे. मी तिसर्‍या पर्वामध्ये स्पर्धक होते. त्यातून बाहेर पडल्यानंतर एक-दोन कार्यक्रम पाहिले आणि तेव्हाच ठरवले की, यापुढे हा कार्यक्रम पहायचा नाही. यामध्ये केवळ भांडणे, मारामारी, राजकारण आणि अश्‍लील भाषेत केलेले संभाषण पहायला मिळते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून मनोरंजन होत नाही, तर केवळ मानसिक त्रास होतो. त्यामुळे अशा कार्यक्रमांपासून मी कायमच दूर रहाण्याचा प्रयत्न करते, असे विधान अभिनेत्री शमिता शेट्टी यांनी एका मुलाखतीत केले आहे.

शमिता शेट्टी ही प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांची लहान बहिण आहे. ‘बिग बॉस’ हा खासगी दूरचित्रवाहिनीवर प्रसारित होणारा कार्यक्रम आहे. सध्या याचे १४ वे पर्व चालू आहे.