‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून तक्रार

तक्रारीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासहित ७ जणांची नावे

मुझफ्फरपूर (बिहार) – सिकंदरपूरमधील आचार्य चंद्रकिशोर पराशर यांनी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दूरचित्रवाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कायक्रमाच्या विरोधात धार्मिक भावनांना ठेच पोचवल्यावरून तक्रार केली आहे. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, दिग्दर्शक अरुणेश कुमार, राहुल वर्मा, वाहिनीचे अध्यक्ष मनजीत सिंह, सी.ई.ओ. एन्.पी. सिंह आणि सहभागी स्पर्धक बेजवारा विल्सन या ७ जणांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. यावर ३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

 (सौजन्य : Muzaffarpur Now)

चंद्रकिशोर पराशर यांनी आरोप केला आहे की, ३० ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये बैजवारा विल्सन स्पर्धक असतांना अमिताभ बच्चन यांनी ६४ लाख रुपयांसाठी ‘२५ सप्टेंबर १९२७ या दिवशी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथातील पाने जाळली होती ?’ या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी ‘विष्णुपुराण, भगवद्गीता, ऋग्वेद आणि मनुस्मृति’ असे ४ पर्याय देण्यात आले होते. हा प्रश्‍न जाणूनबुजून विचारून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला गेला.