गर्भनिरोधकसंबंधी अश्‍लील विज्ञापने तरुणांच्या मनावर परिणाम करतात ! – मद्रास उच्च न्यायालयाचे मदुराई खंडपीठ

अशी विज्ञापने दाखवणार्‍यांना शिक्षा होण्यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे !

मद्रास उच्च-न्यायालयाचे मदुराई खंडपीठ

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने नुकतेच दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होणार्‍या अश्‍लील विज्ञापनांविषयी मत नोंदवतांना म्हटले आहे की, ‘गर्भनिरोधक आणि अंतर्वस्त्र विकण्याच्या नावावर चालवण्यात येणारी विज्ञापने ही ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, १९९४ च्या नियम ७(१)’चे उल्लंघन करत आहेत. काही वाहिन्या दिवसभर अशी विज्ञापने प्रसारित करतात. गर्भनिरोधक संबंधी काही विज्ञापने ही जवळपास अश्‍लील चित्रपटांसारखीच असतात. याचा तरुण प्रेक्षकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो.’

याचिकाकर्ते के.एस्. सागादेवारा यांनी अशा विज्ञापनांच्या प्रसारणावर बंदी घालण्यासाठी एक जनहित याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, धक्कादायक गोष्ट अशी आहे की, रात्री १० वाजता जवळपास प्रत्येक वाहिनीवर अशी काही विज्ञापने चालू असतात, ज्यांमध्ये गर्भनिरोधक विज्ञापनांचा समावेश सर्वाधिक असतो. त्या माध्यमातून अश्‍लीलतेचे प्रदर्शन होत असते.

 (सौजन्य : MIRROR NOW)

ही विज्ञापने सर्व वयाच्या लोकांकडून पाहिली जातात आणि सर्व वाहिन्यांवर दाखवली जातात. या विज्ञापनांमध्ये दाखवली जाणारी नग्नता हा गुन्हा आहे.