मुंबई – राज्यात प्रथमच नव्याने चालू करण्यात आलेल्या अॅक्युपंक्चर महाविद्यालयांमधील वर्ग १ डिसेंबरपासून चालू झाले आहेत. अधिकाधिक जागांवर प्रवेश होण्यासाठी ‘महाराष्ट्र अॅक्युपंक्चर परिषदे’ने सर्व महाविद्यालयांमध्ये २० डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासक्रमाला विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, असेही परिषदेने स्पष्ट केले आहे.