‘नेटफ्लिक्स’वरील ‘अ सुटेबल बॉय’ या वेब सिरीजमधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन

  • मंदिराच्या परिसरामध्ये मुसलमान तरुण हिंदु प्रेयसीचे चुंबन घेत असल्याचे दृश्य

  • पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

  • प्रतिदिन नवनवीन वेब सिरीजमधून हिंदूंचा अवमान केला जात असतांना केंद्र सरकारने अशांवर बंदी घालण्यासाठी किंवा असे प्रसंग काढण्यासाठी जलद प्रयत्न करणे आवश्यक आहे !
  • अशा प्रकारचे प्रसंग अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या परिसरात दाखवण्याचे धाडस कधी केले जाते ?

नवी देहली – ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी अ‍ॅप’वर प्रदर्शित झालेल्या ‘अ सुटेबल बॉय’ या वेब सिरीजमध्ये एका मंदिराच्या परिसरामध्ये मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांचे चुंबन घेतांनाचे दृश्य दाखवण्यात आले आहे. तसेच यातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे. यावरून या वेब सिरीजच्या विरोधात गौरव तिवारी यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. ही वेब सिरीज विक्रम सेठ यांच्या प्रसिद्ध ‘अ सुटेबल बॉय’ या कादंबरीवर आधारित आहे. याचे दिग्दर्शन मीरा नायर यांनी केले आहे.

(वरील छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

गौरव तिवारी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, या वेब सिरीजमध्ये ३ वेळा मंदिराच्या परिसरामध्ये चुंबन दृश्य दाखवण्यात आले आहे. यामध्ये हिंदु तरुणी मुसलमान तरुणाशी प्रेम करते; मात्र सर्व चुंबन दृश्ये मंदिराच्या परिसरात का चित्रीत करण्यात आली आहेत ? या दृश्याच्या वेळी मंदिराचा परिसर आणि आरती दाखवण्यात आली आहे. मी याविरोधात रीवा (मध्यप्रदेश) येथे तक्रार प्रविष्ट केली आहे. नेटफ्लिक्सच्या मोनिका शेरगिल, तसेच दिग्दर्शक यांची नावे यात लिहिण्यात आली आहेत. अशा प्रकारचे दृश्य एखाद्या मशिदीमध्ये अजानच्या पार्श्‍वभूमीवर चित्रीत करण्याचे कलात्मक स्वातंत्र्य नेटफ्लिक्सला आहे का ? हिंदूंच्या सहिष्णुतेला त्यांची दुर्बलता समजू नका. हा मध्यप्रदेशचा नाही, तर शिव आणि कोट्यवधी शिवभक्त यांचा अवमान आहे. त्यासाठी क्षमा मागितली पाहिजे.