निर्देशांकात ३२५ पर्यंत वाढ !
बदलापूर – शहरात रात्री रासायनिक वायू गळती झाली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बदलापूर केंद्रात रात्री ९ च्या सुमारास ‘नायट्रोजन डायऑक्साईड’ची (NO2) नोंद झाली. त्याचा निर्देशांक ५६ वरून ३२५ पर्यंत पोचला. त्यामुळे नेमक्या कोणत्या आस्थापनातून नायट्रोजन डायऑक्साईडची गळती झाली, हे पडताळण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर आहे.
या गळतीमुळे खरवई औद्योगिक वसाहतीच्या शेजारी रहाणार्या रहिवाशांना डोळे चुरचुरणे यासह श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. वातावरणातील दृश्यमानताही न्यून झाली होती.