आषाढी वारीच्या निमित्ताने सरकारने वारकर्यांच्या भावना लक्षात घेऊन ‘पायी वारी’च्या संदर्भात तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग असूनही निवडणुकांच्या कालावधीत, तसेच अन्य वेळीही अनेक वेळा सूट देण्यात आली. तरी आषाढी वारीच्या निमित्तानेही समस्त वैष्णव समाज आणि वारकरी यांच्या भावना लक्षात घेऊन याविषयी सरकारने लवकर निर्णय घेऊन भूमिका स्पष्ट करावी.