
सांगली – ११ व्या शतकात क्रूरकर्मा महंमद गझनीने सोमनाथ मंदिरावर स्वारी करून शिवलिंगाचे तुकडे केले होते. त्या वेळी तेथील काही पुजार्यांनी ते अवशेष जमा केले होते. हे अवशेष १ सहस्र वर्षांपेक्षा अधिक काळ जतन केले आहेत. हे अवशेष कोचीचे शंकराचार्य यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांना दिले. या पवित्र अवशेषांचे शिवलिंग करून त्याचे देशातील सर्व भाविकांना दर्शन देण्यात येत आहे.

सांगली आणि आजूबाजूच्या परिसरांतील भाविकांना शिवलिंगाचा लाभ होण्यासाठी मंगळवार, ८ एप्रिल या दिवशी सकाळी ९.३० ते रात्री ८ या वेळेत हे शिवलिंग श्री महादेव मंदिर, निशांत कॉलनी, बापट मळ्याजवळ ठेवण्यात येणार आहे. तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.