हिंदु राष्ट्राच्या कार्यात मी तुमच्या समवेत आहे ! – श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज, श्री आनंदाश्रम, हरिद्वार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. या कार्यात मी तुमच्या समवेत आहे. सर्व संत एकत्रित प्रयत्न करूया, असे प्रतिपादन श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज यांनी केले.

हिंदु जनजागृती समिती साधूसंतांचे कार्य करत आहे ! – स्वामी सुरेशदास महाराज

भगवी वस्त्रे घालून साधूसंत जे कार्य करत आहेत, तेच कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. तुमचे कार्य अनुकरणीय आहे. समितीच्या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील, असे गौरवोेद्गार स्वामी सुरेशदास महाराज यांनी येथे काढले.

प्रत्येक सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे ! – स्वामी कल्याण देव महाराज

कोणतेही सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे. हिंदु संस्कृतीवर कोणता आघात झाला, तर सर्व साधूसंतानी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, तरच हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ होऊ शकते.

हिंदूंवरील अन्यायाच्या विरुद्ध जागृती करून संघटन निर्माण करण्याची आवश्यकता ! – स्वामी योगेंद्रानंद शास्त्री

साधूसंतांवर अन्याय होत आहे. देशात ठिकठिकाणी हिंदूंची पिळवणूक होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करून संघटितपणा वाढवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वामी योगेंद्रानंद शास्त्री यांनी केले.

अहिंदूंकडून हिंदूंना षड्यंत्र रचून फसवण्यात येत असल्याने त्यांनी सतर्क रहाणे आवश्यक ! – स्वामी तत्त्वचैतन्य पुरीजी महाराज, शिवसदन आश्रम, हरिद्वार

अहिंदूंकडून हिंदूंना षड्यंत्र रचून फसवण्यात येत असल्याने त्यांनी त्याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सुप्रसिद्ध कथाकार पू. रमेशभाई ओझा यांची घेण्यात आली सदिच्छा भेट !

हरिद्वार येथील सुप्रसिद्ध कथाकार पू. रमेशभाई ओझा यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली.

श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात आली भेट !

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीकडून चालवण्यात येत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ अंतर्गत श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची भेट घेण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे हिंदु धर्म आणि संस्कृती रक्षणाचे कार्य प्रेरणादायी ! – श्री १००८ श्री कमलानंद गिरि

तुम्ही किती तळमळीने हे कार्य करत आहात, हे दिसत आहे. तुमच्या प्रबोधन केंद्राला अवश्य भेट देऊ, असे प्रतिपादन येथील श्री कल्याण कमल आश्रमाचे श्री १००८ श्री कमलानंद गिरि यांनी केले.

राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी साधूसंतांनी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता ! – स्वामी सुरेश महाराज

स्वामी सुरेश महाराज यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. या कार्याची समाजाला आवश्यकता आहे’, असे म्हटले. महाराजांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले.

देवता, संत आणि संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा आवश्यक ! – स्वामी कमेश्‍वरपुरी

या कायद्याविषयी सामाजिक माध्यमातील ‘फेसबूक’वरून थेट कार्यक्रम घेऊ शकतो. यासाठी माझे सभागृह तुम्हाला उपलब्ध करून देईन, तसेच धर्मकार्यासाठी जे साहाय्य हवे आहे, ते करण्यासाठी मी सदैव सिद्ध आहे.