समर्पण भक्तीसुधा फाऊंडेशन’ आणि ‘समर्थ व्यासपीठ’ यांच्या वतीने उपक्रम !

उपक्रमात १ लाख ६७ सहस्र ५५३ रामभक्तांचा सहभाग !

पुणे – अयोध्येतील राममंदिर निर्मितीच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त ‘भक्तीसुधा फाऊंडेशन, पुणे’ आणि समर्थ व्यासपीठ, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘रामरक्षा घरोघरी रघुनाथ कृपा करी’ या उपक्रमाच्या एकत्रित संख्येचे समर्पण अयोध्येत श्रीराममंदिरात श्रीरामाच्या चरणी करण्यात आले.

राममंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रामभक्तांनी आपापल्या घरी ३ वेळा संकल्प करून कुटुंबातील सर्वांनी मिळून सामूहिक रामरक्षा पठण करणे, मारुति स्तोत्राचा एक पाठ आणि एक राम नामजपाची माळ असा हा उपक्रम होता. या उपक्रमात देश-विदेशातील एकूण १ लाख ६७ सहस्र ५५३ रामभक्तांनी सहभाग घेतला. सर्व संख्येचे संकलन करून ही संख्या श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यात आली. प्रत्येक वर्षी श्रीराम मंदिराच्या वर्धापनदिनी हा उपक्रम आयोजित केला जाणार असल्याचे ‘फाऊंडेशन’चे अध्यक्ष आशिष केसकर यांनी सांगितले.