उरुळीकांचन (पुणे) येथे गायींची कत्तल करून गोमांस शिजवल्याचा प्रकार उघड !

प्रतिकात्मक चित्र

उरुळीकांचन (जिल्हा पुणे), ६ एप्रिल (वार्ता.) – येथील मौजे गोळेवस्ती येथे गंगाराम पवार, कैलास ढावारे असे दोघे मिळून संगनमताने देशी आणि जर्सी गायी आणून त्यातील काही गायींची तेथेच कत्तल करत आहेत, अशी माहिती गोरक्षक अक्षय कांचन यांना मिळाली. त्यानंतर अक्षय कांचन हे ५ एप्रिल या दिवशी त्यांचे अन्य गोरक्षक सहकारी आणि पोलीस यांसह त्या ठिकाणी गेले. त्या वेळी तिथे एक गाय आणि तिचे कापलेले मुंडके मिळाले, तसेच त्या ठिकाणी एका भांड्यात गायीचे मांस शिजत असलेले दिसले. अधिक पहाणी केली असता कैलास ढावारे यांच्या घराजवळ एक मोठी जर्सी गाय आणि तिचे वासरू कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधलेले आढळले. या प्रकरणी गोरक्षक अक्षय कांचन यांनी उरळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

संपादकीय भूमिका :

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही पोलीस केव्हा करणार ?