देवबंद (उत्तरप्रदेश) येथे १० मुसलमानांनी हिंदु धर्मात केला पुनर्प्रवेश

शुद्धीकरण यज्ञ

देवबंद (उत्तरप्रदेश) – योग साधना यशवीर आश्रमात देवबंद येथील १० मुसलमानांनी इस्लाम त्यागून सनातन धर्मात पुनर्प्रवेश केला. स्वामी यशवीर महाराजांकडून शुद्धीकरण यज्ञ केल्यानंतर ते पुन्हा सनातन धर्मात आल्याचे घोषित करण्यात आले. यज्ञानंतर त्यांनी हिंदु नावेही धारण केली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांनी साधारणपणे ५० वर्षांपूर्वी काही कारणास्तव सनातन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता.

स्वामी यशवीर महाराज म्हणाले की, भारतात रहाणारे सर्व मुसलमान आधी हिंदूच होते. इस्लामच्या शासन काळात त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार झाल्याने अथवा काही आमिषाला बळीपडून सनातन धर्म सोडला होता. आता देशात कसल्याही प्रकारचे भीतीचे वातावरण नाही. सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे अशा लोकांनी सनातन धर्मात पुनर्प्रवेश करावे, असे आवाहन त्यांनी केले.