आळंदी (जिल्हा पुणे) – शहरात श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने श्रीराममंदिर आणि माऊलींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त माऊली मंदिरात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प. संतोष मोझे यांच्या वतीने ह.भ.प. शरद महाराज बंड यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा सहस्रो भाविकांनी लाभ घेतला.
दुपारी २.३० ते सायंकाळी ६ या वेळेत माऊली मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर शिंदेशाही पगडीचे चंदन उटीचे रूप साकारण्यात आले. प्रभु श्रीराम यांच्या पालखीची पूजा आणि आरती सायंकाळी ५ ते ६ या वेळेत संपन्न झाली.