पंडित संजय गरुड (गायन) यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट !

 (डावीकडून) पंडित मोझे, पंडित संजय गरुड, सर्वश्री माधव कुलकर्णी, कृष्णाजी पाटील, विजय चौधरी

पुणे, ६ एप्रिल (वार्ता.) – भुकूम, पुणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करत असतांना भुकूम गावात श्री. दिनेश माझीरे आणि त्यांचे मित्र डॉक्टर पंडित संजय गरुड यांचा संपर्क झाला. पंडित गरुड हे नावाजलेले आंतरराष्ट्रीय स्तराचे गायक आहेत.  त्यांना हिंदु जनजागृती समितीचे कार्य आणि साधना सांगितल्यानंतर प्रभावित होऊन त्यांनी घरी भेटायला बोलावले. त्यांची सदिच्छा भेट घेतांना त्यांच्या समवेत पंडित गरुड यांचे गुरु माधवकाका कुलकर्णी आणि राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले तबलावादक पंडित मोझे यांच्याही भेटी झाल्या. सर्वजण हिंदु जनजागृती समितीचे कार्य ऐकूण प्रभावित झाले.

सोलापूर येथे रहाणारे श्री. माधवकाका कुलकर्णी हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. श्री. माधवकाकांनी ‘सनातन संस्थेप्रमाणे निःस्वार्थ भावाने कार्य करणारे साधक कुठल्याच संघटनेत बघितले नाहीत’, असे गौरवोद्गार काढले. श्री. कृष्णाजी पाटील यांनी सनातन संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून श्री. माधवकाका यांचा सत्कार केला.

या वेळी पंडित गरुड म्हणाले की, तुम्हाला आमच्याकडून काहीही साहाय्य  लागले तर सांगा. १८ आणि १९ एप्रिलला होणार्‍या कार्यक्रमात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन विनामूल्य लावा, तसेच धायरीमधील आपल्या कार्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करू.