औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबाद आणि दौलताबाद गावांचे नामांतर होणार ! – मंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर – औरंगजेबाची कबर असलेले खुलताबादचे नाव रत्नपूर होते. औरंगजेबाने ते पालटून खुलताबाद केले. देवगिरीचे नाव पालटून दौलताबाद केले. खुलताबाद, तसेच दौलताबादचेही नामांतर होणार आहे, असे येथील पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हटले आहे.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, औरंगजेबाने त्याच्या काळात ज्या काही कारवाया केल्या आहेत, त्यामुळे अनेक शहरांची नावे पालटली. धाराशिव आणि नगर यांचे नाव पालटले गेले. हे सगळे ‘बाद, बाद’ आहे. त्यांची नावे पालटण्याचा प्रारंभ आम्ही करत आहोत. औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात येत आहे. आता औरंगजेबाची कबर असणार्‍या तालुक्याचे नाव पालटणार आहे.