सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा ‘वंदनीय रमाबाई रानडे’ पुरस्काराने गौरव !
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांना ‘वंदनीय रमाबाई रानडे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पुणे सार्वजनिक सभा, पुणे’च्या १५५ व्या वर्धापनदिनानिमित्त २ एप्रिल या दिवशी रामेश्वर मार्केट, विजय मारुति चौक येथील सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.