|

नवी देहली – लोकसभा आणि राज्यसभा येथे बहुमताने संमत झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला संमती दिली आहे. केंद्र सरकारने नवीन कायद्याविषयी राजपत्र अधिसूचना प्रसारित केली आहे. आता केंद्र सरकार या कायद्याच्या कार्यवाहीच्या दिनांकाविषयी स्वतंत्र अधिसूचना प्रसारित करणार आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे खासदार महंमद जावेद, ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तथा अखिल भारतीय मुसलमान एकता संघाचे) खासदार असदुद्दीन ओवैसी आणि आपचे आमदार अमानतुल्ला खान यांनी या कायद्याला स्वतंत्र याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यांत म्हटले आहे की, वक्फ सुधारणा कायदा मुसलमानांच्या संदर्भात भेदभाव करतो. तसेच त्यांच्या मूलभूत अधिकारांचेही उल्लंघन करतो.