विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून तेथे नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पराक्रमाचे भव्य स्मारक उभारा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘शिवप्रभूंच्या विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र ! 

​महाराष्ट्रातील गड-किल्ले हे हिंदूंचे अस्मितारूपी वैभव ! आज मात्र या गड-किल्ल्यांचे इस्लामीकरण वेगाने होतआहे. हा हिंदूंच्या गौरवशाली इतिहासावरील घाला असून याला सर्वस्वी पुरातत्व विभाग आणि आतापर्यंतचे सर्वपक्षीयशासनकर्ते उत्तरदायी असल्याची भावना हिंदूंमध्ये आहे. या गडांच्या संवर्धनासाठी धर्मप्रेमी हिंदूच स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत. या गडांपैकी एक असलेल्या ‘विशाळगडा’ची सद्य:स्थिती, गडाचे होत असलेले इस्लामीकरण रोखण्यासाठी उपाययोजनायांविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या परिसंवादांतर्गत ‘शिवप्रभूंच्याविशाळगडाचे इस्लामीकरण रोखा !’ या ‘ऑनलाईन’ चर्चासत्रात विचारमंथन करण्यात आले. बाजीप्रभु देशपांडे यांचे ११ वेवंशज श्री. संदेश देशपांडे, वेंगरूळ (कोल्हापूर) येथील ‘सव्यासाची गुरुकुलम्’चे प्रधान प्राचार्य श्री. लखन जाधव, मूर्तीअभ्यासक श्री. प्रमोद सावंत आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आदीमान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

​या चर्चासत्राचे समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी सूत्रसंचालन केले. ८ सहस्रांहून अधिक शिवप्रेमी, धर्मप्रेमी, दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचा लाभ घेतला.

श्री. सुनील घनवट

पुणे – ३५० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि गड-किल्ले यांच्या स्फूर्तीस्थानांविषयी चर्चा होणे अपेक्षितअसतांना मात्र ‘विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा’ या विषयावर चर्चा होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. जो विशाळगड नरवीरबाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या नावाने ओळखला जायला हवा, तो आज ‘रेहानबाबा दर्गा’ या नावाने, तरगडावरील घोड्याच्या टापेच्या तीर्थाला ‘रेहानबाबाचे तीर्थ’ म्हणून सांगितले जाते. हे गडाचे इस्लामीकरण नव्हे, तर काय आहे? याला पुरातत्व विभाग उत्तरदायी आहे. ही अतिक्रमणे तात्काळ हटवून सरकारने पन्हाळा ते विशाळगड रणसंग्रामाचे, छत्रपतीशिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्यासह मावळ्यांच्या पराक्रमाचे भव्य स्मारकगडावर उभारावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीकेले.

श्री. सुनील घनवट यांनी मांडलेली विशाळगडाविषयीची प्रशासकीय अनास्था !

  • गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधी उपेक्षित अवस्थेत आहे. त्यांच्या नावाचासाधा फलकही तेथे नाही. कोणत्याही योजनेअंतर्गत गडावरील समाधीचे जतन, डागडुजी किंवा जीर्णोद्धार झालेला नाही.
  • गडावरील अनेक प्राचीन मंदिरांची भग्नावस्था पाहून सरकार आणि प्रशासन यांची अनास्था, उदासीनता दिसून येते. सरकारीयंत्रणांना गड रक्षण, अस्मिता, वैभवशाली वारसा यांच्याशी काही घेणे देणे नाही, हे लक्षात येते.
  • या गडावर रेहानबाबा दर्ग्याच्या रस्त्यासाठी अन् सुशोभिकरणासाठी सरकार १० लाख रुपये खर्च करते; मात्र नरवीरांच्यासमाधींवर छप्पर बांधण्यासाठी प्रशासनाकडे पैसा नाही. काही शिवप्रेमी संघटनांनी स्वखर्चाने या समाधींवर छप्पर बसवलेआहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी गडावर माहिती देणारे फलक बसवल्यावर ते धर्मांधांकडून काढून टाकण्यात आले.

पुरातत्व विभागाची भूमिका उदासीन ! – प्रमोद सावंत, मूर्ती अभ्यासक

प्रमोद सावंत, मूर्ती अभ्यासक

१. दर्ग्याला अतिरिक्त महत्त्व देऊन त्याचे बांधकाम वाढवण्याचा घाट घातला जाणे घातक आहे. गडाची ग्रामदेवता श्रीवाघजाईदेवीचे मंदिर अस्तित्वात आहे कि नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांची भूमिकाउदासीन असून त्यांना काय करावे ? याचे ज्ञान नाही. त्यांना त्यांच्या अंतर्गत येणार्‍या गोष्टींविषयी खडसावून सांगावे लागतआहे.

२. विशाळगडावरील मंदिरे आणि स्मारके यांची कामे स्वखर्चाने करण्यासाठी अनेक स्थानिक संस्था सिद्ध आहेत. पालकमंत्र्यांसमवेत चर्चा करून त्यांनी आदेश दिल्यास निधीची उपलब्धता, गडावरील देवतांच्या मूर्तींचे वज्रलेप आणिसमाधीचे भव्य स्मारक करण्यासंदर्भातील आराखडा सिद्ध करणार आहे.

गड-किल्ल्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या पुरातत्व विभागाच्या भूमिकेविषयी हिंदुत्वनिष्ठांनी जनजागृती करायला हवी ! – लखन जाधव, प्रधान आचार्य, ‘सव्यासाची गुरुकुलम्’

लखन जाधव, प्रधान आचार्य, ‘सव्यासाची गुरुकुलम्’

मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांत गड-किल्ल्यांची पुष्कळ काळजीपूर्वक जपणूक केली जाते; मात्र ज्यामहाराष्ट्रात घोड्यांच्या टापांनी सीमारेषा आखल्या, त्या महाराष्ट्रात गड-किल्ल्यांची दु:स्थिती आहे. सरकार आणि पुरातत्वविभागाने शिवप्रभूंच्या अनेक ऐतिहासिक गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष केले आहे. जवळपास ८० टक्के गडांची ही स्थिती आहे. पन्हाळ्याजवळील पावनगडावर मंदिरांत देवतांच्या मूर्तीही नाहीत. मंदिराच्या तटबंदीची दगडे लोकांनी घरे बांधण्यासाठीवापरली आहेत. अनेकांना हा गड आहे, हेही ठाऊक नाही. येथे मदरसाही आहे. आपल्या खिशातून ज्यांच्यासाठी निधी जातो, तो पुरातत्व विभाग काय करत आहे ? आज अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना गड-किल्ल्यांच्या संवर्धन-स्वच्छतेसाठी प्रयत्न करतआहेत. गडांचे आपण प्राणपणाने रक्षण केले पाहिजेच; परंतु पुरातत्व विभागाच्या (उदासीन) भूमिकेविषयीही जनजागृतीकरायला हवी, असे प्रतिपादन ‘सव्यासाची गुरुकुलम्’चे प्रधान आचार्य श्री. लखन जाधव यांनी केले.

हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

या वेळी हिंदुत्वनिष्ठ, तसेच विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे सदस्य सर्वश्रीकिशोर घाटगे, संभाजीराव भोकरे, सुरेश यादव यांनी ‘विशाळगडावरील अतिक्रमणे हटवल्याविना आम्ही शांत बसणार नाही’, असा निर्धार केला.

विशेष अभिप्राय

​या वेळी अनेकांनी ‘तुम्ही आम्हाला कधीही बोलवा. आम्ही गडावर येऊन गडाची काळजी घेऊ. महाराजांनी पुष्कळकष्टाने गड मिळवले आहेत. ते होते म्हणून आपण आहोत’, असे सांगितले.

पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे शिवप्रेमींवर विशाळगडाचे संवर्धन करण्यास बंधने ! – संदेश देशपांडे, बाजीप्रभु देशपांडे यांचे११ वे वंशज

संदेश देशपांडे, बाजीप्रभु देशपांडे यांचे ११ वे वंशज

१. विशाळगडाची स्थापना शिलाहार राजांनी १२ व्या शतकात केली. त्यानंतर तो यादव राजांच्या आणि नंतर साधारण २००वर्षे मोगलांच्या कह्यात गेला. त्यानंतर आजतागायत तो हिंदूंच्या कह्यात आहे. कोल्हापूरची बाजारपेठ आणि तळ कोकणातीलबंदर यांना जोडणार्‍या वाटेचे संरक्षण अन् लक्ष ठेवणे यांसाठी गडाची निर्मिती झाली; पण दुर्दैवाने आज आपल्यालाविशाळगडावर लक्ष ठेवावे लागत आहे.

२. ग्रामस्थ आणि शिवप्रेमी संघटना गडाची निगा राखण्यास सिद्ध आहेत; मात्र पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे त्यांना कामकरता येत नाही. गडावरील मंदिरे अत्यंत विदीर्ण अवस्थेत आहेत. माहितीफलक नसल्याने ती सापडतही नाहीत. तेथेजाण्यासाठी योग्य वाट नाही. गडाचे बुरुज, कमानी ढासळले आहेत. येथे बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांचीसमाधी असल्याचे बहुतांश जणांना ठाऊक नाही. खिंडीतील स्मारकालाच त्यांची समाधी समजले जाते.

३. बहामनी सत्तेचा सेनापती रेहान मलिक याने ६ वेळा हा गड जिंकण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला यश आले नाही. सातव्यावेळी ९ मास सलग झुंज दिल्यानंतर त्याला (कसाबसा) तो जिंकता आला. या रेहान बाबाचा गडावर दर्गा असून येथे हिंदूहीनवस बोलत आहेत.

दर्शकांचे अभिप्राय

  • बन्सीकुमार जीतुरी – जय शिवराय ! डोळे झाकून बसलेल्या हिंदूंच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्याचे काम हिंदुजनजागृती समितीच्या वतीने होत आहे. हिंदु समाज सदैव आपला ऋणी राहील.
  • सार्थक रहाणे – समस्त हिंदुत्वनिष्ठ तरुणांनी या आंदोलनात सामील व्हावे. विशाळगड मुक्त करण्यासाठी आम्ही आंदोलनकरण्यास सिद्ध आहोत.