सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल ! – रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज, बडास्थान (अयोध्या)

हरिद्वार, १६ एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती अत्यंत चांगले कार्य करत आहे. तीनही लोकांमध्ये हे केंद्र विकसित हो आणि रामराज्याची परिकल्पना सत्यात येवो, अशा शुभेच्छा देतो. हिंदु धर्म एक आणि भारत अखंड होण्यासाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य रामबाणासारखे कार्य करेल. संपूर्ण राष्ट्र एक होवो. हिंदु राष्ट्राची परिकल्पना येथे दिसून येत आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल. रामजन्मभूमीतही राममंदिर उभे रहात आहे. राममंदिरासह रामराज्याची स्थापना होऊन सर्वांचे सार्थक होईल. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला माझ्या शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन बडास्थान (अयोध्या) येथील रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज यांनी केले. येथील चालू असलेल्या कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला त्यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी वरील मार्गदर्शन केले. या वेळी त्यांच्या समवेत ठाणे येथील उद्योजक श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर ठाणावाला हेही उपस्थित होते. समितीच्या कार्याला भरभरून आशीर्वाद देतांना ते म्हणाले की, तुमची (हिंदु राष्ट्राची) मनोकामना पूर्ण होवो आणि ईश्‍वराने तुम्हाला शक्ति देवो.

सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रातील फलक पाहतांना उजवीकडून महंत जन्मेजय शरण महाराज, नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. समवेत श्री. सुनील घनवट (सर्वांत डावीकडे)

या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी महंत जन्मेजय शरण महाराज यांचा सन्मान, तर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्री. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचा सत्कार केला. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक हेही उपस्थित होते.

‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’चा लाभ करून घेतल्यास लोकांचे कल्याण होईल ! – नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला

१. भारतभरात जिथे कुंभमेळा भरतो, तिथे हिंदु जनजागृती समिती नैतिकतेने आणि सात्त्विकतेने कार्य करत आहे. यात त्यांचा कोणताही स्वार्थ नाही. कार्यकर्ते व्यक्तीगत धनाचा त्याग करून हे कार्य करतात. कुंभमेळ्यात जे प्रबोधन केंद्र लावण्यात आले आहे, त्याचा सहस्रो लोकांनी लाभ करून घ्यायला हवा. याचा लाभ करून घेतल्यास लोकांचे कल्याणच होईल, हे मी खात्रीने सांगू शकतो. सर्वांनी एकत्र आले, तरच हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार होऊ शकते.

२. लोकांनी भ्रष्टाचार सोडून योग्य मार्गाने काम करावे, तरच चांगले दिवस येतील; मात्र यासाठी वेळ लागेल.

३. भारतात रहायचे, तर भारतमाता म्हणायलाच पाहिजे. यात जाती-पातीचा प्रश्‍न येत नाही; कारण भारतभूमी ही आपली माता आहे. ‘मातृदेवो भव ।’ अशी सनातन संस्कृतीची शिकवण आहे.

४. देशात गायींची हत्या होत आहे. ६-७ वर्षांत गायींच्या हत्येचे प्रमाण दुपटीने वाढले. कारखानेही वाढले. गायींना मारून कधीही सुख मिळू शकत नाही. त्यामुळे लोकांनी आणि राजकीय व्यक्तींनीही अयोग्य कर्म सोडून योग्य कर्म करावे, तरच आपला देश सुखी होऊ शकतो.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी श्री. ठाणावाला यांनी काढलेले कौतुकोद्गार !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी श्री. ठाणावाला म्हणाले, ‘‘आम्ही संत नाही, तर तुम्हीच संत आहात. तुम्हीच आमच्याकडे महाप्रसादासाठी या. सर्व भगवंताचे आहे, आमचे काही नाही. तुमचे कार्य प्रशंसनीय आहे. गोव्याची सनातन संस्था अनेक वर्षांपासून धर्माचे (धर्मप्रसाराचे) कार्य करत आहे; परंतु मिळत असलेल्या प्रतिसादाविषयी तुम्ही वाईट वाटून न घेता कर्म करत रहा. रामराज्य आणण्यासाठी सर्वांच्या सहयोगाची आवश्यकता आहे.’’