अमरावती येथे ‘ब्रह्माकुमारीज’च्या वतीने सनातन संस्थेचा सन्मान !

रुक्मिणीनगर येथील ‘ब्रह्माकुमारीज’ सेवाकेंद्रात २५ नोव्हेंबर या दिवशी आयोजित कार्यक्रमात समाजसेवेसाठी विविध क्षेत्रांतील संस्था आणि मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘सनातन संस्थे’चाही विशेष सन्मान करण्यात आला.

पर्वरी (गोवा) येथे ३० नोव्हेंबरला होणार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सवी सन्मान !

गोवा राज्यात स्थापन झालेल्या आणि सध्या संपूर्ण भारतात सनातन हिंदु धर्माचा तेजस्वी प्रचार करणार्‍या सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा साजरा होणार आहे.

अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !

मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार असे विविध आजार असणार्‍या ४० रुग्णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले. उपचारानंतर रुग्णांनी ‘बरे वाटले’, असे सांगितले. उपाशीपोटी रुग्णांची पडताळणी कशी करावी ?

गोव्यात ३० नोव्हेंबरला सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा !

प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते अमृतमहोत्सवी सन्मान होणार !

प.पू. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनुयायी निरूपणकार रवींद्रजी पाठक यांना सनातन पंचांग भेट !

प.पू. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनुयायी निरूपणकार श्री. रवींद्रजी पाठक यांना ब्रह्मचैतन्य धाम कन्हाल (माकली), बुटीबोरी, जिल्हा नागपूर येथील कार्यक्रमात वर्ष २०२५ चे ‘सनातन पंचांग’ भेट देण्यात आले.

पुणे येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन !

विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी प्रथम सत्र परीक्षेच्या ‘ओपन डे’च्या निमित्ताने पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. जयश्री काळे यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

‘सनातन संस्था’ आयोजित बिंदूदाबन शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला लाभ !

आगामी भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्‍या वेदना न्यून होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार’ शिबिर आयोजित करण्यात आले होते.

निष्‍क्रिय अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी न्‍यायालयाने जामीन नाकारल्‍याने ज्ञानेश महाराव याला तात्‍काळ अटक करा ! – प्रसाद पंडित, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्‍कलकोट

नवी मुंबई येथील विष्‍णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेड या संघटनेच्‍या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव याने सार्वजनिक मंचावर देवतांविषयी अकारण अपकीर्ती करणारी आणि अपमानास्‍पद विधाने केली होती.

एकाच वेळी ३ संत घोषित झाल्याची सनातनच्या इतिहासातील दुर्मिळ घटना !

या वेळी पू. रमानंद गौडा यांनी सांगितले की ‘गुरूंदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) कर्नाटकातील सर्व साधकांना केवळ आनंदच नाही, तर चैतन्यमय अशी आनंदवार्ता दिली आहे.

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, सात्त्विक आहाराचे महत्त्व, असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम आणि आधुनिक आहाराचे तोटे आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.