हनुमानाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना विधीचे सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि विधींमुळे होणारा लाभ !

‘महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमामध्ये २३ ते २७ एप्रिल २०२१ मध्ये ‘सेतुरक्षक श्री हनुमान प्रतिष्ठापना विधी’ झाले. या विधींच्या अंतर्गत अनेक उपविधी करण्यात आले. देवाच्या कृपेने त्यांचे सूक्ष्म परीक्षण केल्यावर जाणवलेली सूत्रे आणि त्यांतील काही विधींचे विवरण येथे दिले आहे.  

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमामधील श्री हनुमानाची मूर्ती

१. दिनांक २५.४.२०२१ ला झालेले विधी 

वास्तुहोम करणे आणि त्याचा लाभ : वास्तुहोमामुळे वास्तुपुरुष संतुष्ट होऊन आशीर्वाद देतो. त्यामुळे वास्तूत रहाणार्‍या जिवांचे ऐहिक आणि पारमार्थिक दृष्ट्या कल्याण होते. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या वास्तुदेवतेला उद्देशून केलेल्या होमामुळे वास्तुदेवता संतुष्ट झाली आणि तिने साधकांच्या व्यष्टी अन् समष्टी साधनेसाठी आशीर्वाद दिले. त्यामुळे रामनाथी आश्रमाच्या वास्तूकडे ब्रह्मांडातील विविध देवतांच्या तत्त्वलहरी आणि निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य लहरी आकृष्ट होऊ लागल्या. आश्रमाच्या परिसरातील विविध देवतांच्या मंदिरातील देवतांनी वास्तुदेवतेला साहाय्य करण्यासाठी देवतांच्या तत्त्वलहरी आणि निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य लहरी यांचे रूपांतर सगुण लहरींमध्ये केले. त्यामुळे वास्तुदेवतेला देवतांच्या तत्त्वलहरी आणि चैतन्याच्या लहरी सहजतेने ग्रहण करता आल्या. त्यामुळे वास्तू चैतन्याने भारित झाली. त्याचप्रमाणे आश्रमाच्या वास्तूच्या भोवतीच्या वायुमंडलामध्ये देवतांच्या तत्त्वलहरी आणि निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य लहरी यांचे आच्छादन निर्माण झाल्यामुळे साधकांच्या श्वासातून हे चैतन्य त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांमध्ये पसरते. त्यामुळे साधकांना या चैतन्यदायी वातावरणाचा लाभ होऊन त्यांची या चैतन्यमय वातावरणात साधना चांगली होते.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

मंदिरावर कळस स्थापन करण्याचे महत्त्व  

‘पृथ्वीवरील मंदिरात स्थापन केलेली देवतेची मूर्ती आणि ब्रह्मांडातील देवतांच्या तत्त्वलहरी यांच्यामधील दुवा म्हणजे मंदिराचा कळस असतो. त्यामुळे प्रत्येक देवतेच्या मंदिरावर कळस स्थापन करणे आवश्यक आहे. कळसामुळे मंदिरात स्थापन केलेल्या ब्रह्मांडात पसरलेल्या देवतेच्या तत्त्वलहरी मूर्तीकडे अधिक प्रमाणात आकृष्ट झाल्यामुळे देवतेची मूर्ती चैतन्याने भारित होते. त्यामुळे मूर्तीला पहातांना ती मूर्ती सजीव असल्याप्रमाणे जाणवते. अशा मूर्तींना केलेली प्रार्थना किंवा नवस पूर्ण झाल्याची प्रचीती येते. त्यामुळे अशा देवतांच्या मूर्तींना ‘जागृत देव’ असे संबोधले जाते.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले

२. २७.४.२०२१ ला झालेले विधी 

२ अ. षोडशोपचारांच्या वेळी सूक्ष्मातून घडणार्‍या प्रक्रिया 

कृतज्ञता 

भगवंताच्या कृपेमुळे श्री हनुमानाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना विधीचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा मला मिळाली आणि त्यानेच ही सेवा माझ्याकडून करवून घेतली. ‘या सेवेच्या अंतर्गत मला पुष्कळ नवीन सूत्रे शिकायला आणि अनुभवायला मिळाली’, यासाठी मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.