Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !

छायाचित्रात डावीकडून श्री. मधुसुदन कुलकर्णी, श्री. नारायण नाडकर्णी, पू. पृथ्वीराज हजारे, श्री. चेतन राजहंस, संकेस्थळाचे उद्घाटन करतांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, श्री. रमेश शिंदे आणि अधिवक्ता राजेश गावकर

पणजी (गोवा) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फर्मागुडी, फोंडा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी येथील मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आले.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे बोधचिन्ह

या वेळी मुख्यमंत्र्यांनी संकेतस्थळाचे अवलोकन केले, तसेच कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील पू. पृथ्वीराज हजारे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच श्री. नारायण नाडकर्णी, श्री. मधुसूदन कुलकर्णी आणि अधिवक्ता राजेश गावकर असे उपस्थित होते.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कार्यक्रम स्थळाची प्रतिकृती

या संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे, ज्यात सध्या सनातन राष्ट्राचा उद्देश; सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय यांचा समावेश आहे. महोत्सवाच्या दृष्टीने वेळोवेळी या संकेस्थळावर अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यासह सनातन संस्थेच्या वतीने या महोत्सवासाठी (Sanatan.org/en/donate)धर्मदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.