कौशल्याने सेवा करून इतरांना आधार देणारे चि. कुशल गुरव आणि कृतज्ञताभावाने सेवा करणार्‍या चि.सौ.कां. किरण व्हटकर !

‘१७.१.२०२५ या दिवशी चि. कुशल गुरव आणि चि.सौ.कां. किरण व्हटकर यांचा शुभविवाह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत आहे. त्यानिमित्त त्यांचे नातेवाईक, संत आणि साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असणारे आघारी (दापोली, रत्नागिरी) येथील कै. प्रभाकर धोंडू काष्टे (वय ६६ वर्षे) !

‘१९.१२.२०२४ या दिवशी आघारी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील प्रभाकर धोंडू काष्टे (वय ६६ वर्षे) यांचे कळंबोली, तालुका पनवेल येथे निधन झाले. साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सात्त्विक आणि साधनेची आवड असणारा ५२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला परळी वैद्यनाथ (जिल्हा बीड) येथील कु. लक्ष रितेश जैस्वाल (वय ६ वर्षे) !

परळी वैद्यनाथ (जिल्हा बीड) येथील कु. लक्ष रितेश जैस्वाल याच्या वाढदिवसानिमित्त त्याची आई, आजी आणि सनातन संस्थेच्या ११२ व्या समष्टी संत पू. दीपाली मतकर यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

शांत स्वभावाच्या आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या सौ. वैष्णवी बधाले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) !

सौ. वैष्णवीच्या चेहर्‍यावर आध्यात्मिक अभ्यासाच्या तेजाची एक चमक आहे. तिला लहानपणापासून आध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनाची आवड आहे.

प्रामाणिक आणि इतरांना साहाय्य करणारे ठाणे येथील कै. यशवंत सदाशिव शहाणे (वय ८० वर्षे) !

रुग्णाईत असतांना पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही त्यांना सांगितलेले प्रत्येक सूत्र ते स्वीकारत होते. ते पूर्णपणे सकारात्मक होते.

नियोजनकौशल्य, तत्त्वनिष्ठता आणि इतरांना समजून घेणार्‍या रामनाथी आश्रमातील सुश्री (कु.) मेघा चव्हाण (वय ४२ वर्षे) !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सुश्री (कु.) मेघा चव्हाण यांचा पौष कृष्ण द्वितीया (१५.१.२०२५) या दिवशी ४२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

रुग्णाईत स्थितीतही स्थिर आणि ईश्वराच्या अनुसंधानात असणारे ठाणे येथील कै. यशवंत सदाशिव शहाणे (वय ८० वर्षे) !

रुग्णालयात शहाणेकाकांच्या समवेत असलेल्या अन्य रुग्णांची परिस्थिती पहाता ‘काका त्यांना होणार्‍या प्रचंड वेदना सहजतेने सहन करत आहेत’, असे लक्षात येत होते. पुष्कळ वेदना होत असूनही त्यांनी कधी चिडचिड केली नाही. ‘साधनेमुळे व्यक्तीत पालट कसा होतो आणि देव त्याचे प्रारब्ध कसे सुसह्य करतो ?’, हे माझ्या लक्षात आले.

वैद्यकीय व्यवसाय नीतीने करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे लासलगाव (जिल्हा नाशिक) येथील कै. आधुनिक वैद्य सुशील मनोहर कुलकर्णी  (वय ६४ वर्षे)!

आधुनिक वैद्य सुशील कुलकर्णी यांनी वैद्यकीय पेशाकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिले नाही. एवढ्या महागाईच्या काळातही ते रुग्णांकडून अल्प प्रमाणात ‘फी’ घेत असत. त्यांनी दिलेल्या औषधाने रुग्णांना त्वरित गुण येत असे.’ 

उत्साही आणि आनंदी असणार्‍या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती दाते (वय ६० वर्षे) !

सौ. ज्योतीकाकू पू. आजींची सेवा पुष्कळ भावपूर्ण करतात. त्या प्रत्येक कृती करतांना पू. आजींना सांगून ती कृती करतात. रुग्णाईत असलेल्या ‘पू. आजीही त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देतात’, असे मला जाणवते.

कठीण परिस्‍थितीत स्‍थिर राहून मुलींना साधनेत साहाय्‍य करणार्‍या कोची, केरळ येथील श्रीमती नीता सुखटणकर (वय ७५ वर्षे) !

‘माझी आई श्रीमती नीता सुखटणकर (वय ७५ वर्षे) हिच्‍या आयुष्‍यात अनेक चढ-उतार आले. तिला अनेक वर्षे पुष्‍कळ मानसिक संघर्ष सहन करावा लागला. देव आणि गुरु यांच्‍यावर असलेल्‍या तिच्‍या श्रद्धेमुळे ती कठीण प्रसंगांना सामोरे गेली. तिने कष्‍टमय जीवनाचा कधीही कंटाळा केला नाही.