आनंदमय जीवनासाठी दोषनिर्मूलन आणि गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. मधुलिका गोयल, सनातन संस्था

आपल्यातील दोषांचे अधिक्य आणि सद्गुणांचा अभाव आपले जीवन तणावग्रस्त बनवते. आपण कोणत्याही परिस्थितीकडे कसे पहातो ?, हे आपले गुण आणि दोष यांवर अवलंबून आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सामवेदी कार्तिक जोशी यांच्याकडून ‘सामगान’

सनातन संस्था ही एकमात्र अशी संस्था आहे, जिच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा, प्रेम, आनंद आणि अभिमान आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे कार्य वैदिक, पुरोहित आणि ब्राह्मण यांच्यासह सनातन संस्थाही करत आहे, असे कौतुकोद्गार सामवेदी कार्तिक जोशी यांनी काढले.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे हिंदु धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच, त्यामुळे अनेक जण या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून स्वतःच्या तिन्ही मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या आणि स्वतःही पूर्णवेळ साधना करणार्‍या श्रीमती संध्या बधाले (वय ५० वर्षे) !

पूर्वी आईला आमची काळजी वाटत असे; परंतु ‘प.पू. गुरुमाऊली सर्वकाही चांगलेच करणार आहेत’, असा भाव ठेवून आता ती निश्चिंत आणि आनंदी रहाते.’

सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे !

श्री. दादा वेदक यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, आश्रमात पाय ठेवताच सकारात्मक ऊर्जा जाणवली. आश्रमातील स्वच्छता आणि सेवाभाव कौतुकास्पद आहे.

ठाणे जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने व्यापक धर्मप्रसार !

हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या परिसरात २२ ठिकाणी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ याचे प्रदर्शन अन वितरण केंद्रे उभारण्यात आली होती.

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. प्रवचन झाल्यावर उपस्थित जिज्ञासूंनी दत्ताच्या नामजपाविषयी सविस्तर जाणून घेतले.

पुणे येथे सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त अभूतपूर्व उत्साहात पार पडली सनातन गौरव दिंडी !

सनातन धर्माच्या प्रसारासाठी समर्पित असलेल्या सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन

सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवाच्या अंतर्गत झारखंडमधील विविध क्षेत्रातील लोकांसाठी नुकतेच ‘तणाव नियंत्रण’ या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आनंदी जीवन जगण्यासाठी नामजपासह स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन आवश्यक ! – सौ. मधुलिका गोयल, सनातन संस्था

नामसाधनेसह आपल्यातील दोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आनंदमय जीवन कसे जगायचे, यासाठी सनातन संस्था मार्गदर्शन करते, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. मधुलिका गोयल यांनी येथील ‘गगन भारती पब्लिक सिनियर सेकेंडरी स्कूल’मध्ये आयोजित ‘तणावमुक्ती कार्यशाळे’त केले.