नेवासे (जिल्हा नगर) येथे कहार समाज सेवा ट्रस्टच्या वतीने ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन

मुंबादेवी मंदिरात शिवजयंती आणि रथसप्तमी यांनिमित्ताने श्री. संतोष (भाऊ) पंडुरे यांच्या पुढाकाराने कहार समाज सेवा ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

अमेरिकेत शिवराज्याभिषेक; शिवजयंतीनिमित्त मराठी बांधवांकडून महानाट्य

अमेरिका येथील कनेक्टिकटमधील DARHCT (देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट) संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या (CTMM) चमूने २० फेब्रुवारी या दिवशी शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने ‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वर ‘कोरोना विषाणू – आध्यात्मिक कारणे आणि नवीन आरंभ’ या कार्यक्रमाचे प्रसारण !

‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वरील कार्यक्रमात एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले अन् साधिका गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांनी विषयाचे सादरीकरण केले.

वर्ष २०२० आणि २०२१ चे ‘लोक हिंद गौरव’ पुरस्कार घोषित

२७ फेब्रुवारी या दिवशी शहापूर येथील कुमार गार्डन सभागृह येथे सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार असून दोन्ही वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येणार आहेत.

बळाच्या नव्हे, तर हिंदु धर्माच्या आधारे ‘अखंड भारता’ची निर्मिती शक्य ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सनातन धर्म मानवता आणि संपूर्ण जगाचा धर्म आहे अन् सध्या त्याला ‘हिंदु धर्म’ असे म्हटले जाते. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’च्या आधारे जगामध्ये पुन्हा आंनद आणि शांतता निर्माण करता येऊ शकते.

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला देहली येथील शेतकरी आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या ग्रेटा थनबर्ग हिला बोलावणार

देशातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कार्यक्रमाला बोलावण्यामागील आयोजकांचा हेतू काय आहे ? याची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणी दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी !

सूर्यनमस्कार स्पर्धेत श्रद्धा गोखले-लेले यांचा प्रथम क्रमांक

मिरजेत तेजोपासना परिवाराच्या वतीने रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनी १ लाख ११ सहस्र १११ सूर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण करण्यात आला. सूर्यनमस्कार स्पर्धेत मिरज येथील श्रद्धा गोखले-लेले यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

भरतमुनी यांच्या जयंतीच्या निमित्ताने २७ फेब्रुवारीला विविध कार्यक्रम

प्रतिवर्षीप्रमाणे संस्कार भारती सांगली यांच्या वतीने २७ फेब्रुवारी या दिवशी आद्य नाट्यशास्त्रकार भरतमुनी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सौ. साधना कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्या यांचे ‘नृत्याविष्कार’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी आयोजित काँग्रेसच्या ‘जन आक्रोश सभे’त हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य

काँग्रेसची ‘जन आक्रोश सभा’ ! मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य ! या वेळी मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि त्यांच्यासमोर हे नृत्य चालू होते. काँग्रेसला शेतकर्‍यांविषयी किती प्रेम आहे, हे स्पष्ट होते !

झोपी गेलेला हिंदु समाज जागा होईल, त्यावेळी तो सगळे जग प्रकाशमान करील ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आज देशात कुणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदु पूर्वजांचेच वंशज आहेत. कुणी आपल्याला पालटेल याची भीती नाही; पण या गोष्टी आपण विसरून जाऊ, याची भीती आहे.