झोपी गेलेला हिंदु समाज जागा होईल, त्यावेळी तो सगळे जग प्रकाशमान करील ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘ऐतिहासिक कालगणना : एक भारतीय विवेचन’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी संघप्रमुख श्री. मोहन भागवत

नवी देहली – हिंदुत्व म्हणजे सत्यासाठी सातत्याने होणारे संशोधन, असे म. गांधी म्हणायचे. हे काम करता करता आज हिंदु समाज थकला आहे. तो झोपी गेला आहे; परंतु ज्या वेळी तो जागा होईल, त्यावेळी आधीपेक्षा अधिक ऊर्जेने कामाला लागेल आणि सगळे जग प्रकाशमान करील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. ते एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी बोलत होते.

सरसंघचालक पुढे म्हणाले की,

१. संपत्ती मिळवण्याच्या हेतूने आक्रमक शक्तींनी भारतावर आक्रमण केले. शक, हूण, कुशाण आले; पण ते आपल्यामध्ये सामावून गेले. त्यानंतर इस्लाम वेगळ्या स्वरूपात आला. ‘जो आमच्यासारखा होईल, तोच रहाणार. जो आमच्यासारखा होणार नाही, त्याला रहाण्याचा अधिकार नाही’, अशी त्यांची भूमिका होती.

#CCIEvents Book Release Function organized by Centre for Civilisation Studies attended by #DrMohanBhagwat Dr. Satyapal Singh Sudhakar Shrangare & other eminent dignataries today.

Posted by Constitution Club Of India on Sunday, February 21, 2021

 

२. मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या प्रतीकांची मोडतोड केली. त्यांच्या विरुद्धची लढाई दीर्घकाळ चालली. लढाईदेखील संबंधांस कारण ठरते. त्यामुळेच आक्रमणकर्त्यांवरही  भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा प्रभाव पडू लागला. समरसतेची प्रक्रिया चालू झाली. त्यामध्ये दारा शिकोहसारखे लोक सहभागी झाले. त्यांनी वेदांचा अभ्यास केला. त्यांचा अनुवाद केला; मात्र एकता स्थापन करण्याच्या प्रक्रियेला विस्थापित करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला.

३. आज देशात कुणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदु पूर्वजांचेच वंशज आहेत. कुणी आपल्याला पालटेल याची भीती नाही; पण या गोष्टी आपण विसरून जाऊ, याची भीती आहे.