
अमेरिका – येथील कनेक्टिकटमधील DARHCT (देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट) संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या (CTMM) चमूने २० फेब्रुवारी या दिवशी शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले. शिवजन्मापासून स्वराज्य स्थापनेच्या राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत सर्व घटनांचा समावेश असलेला बहुमाध्यमिक म्हणजे नाच, पोवाडे, नाट्य, देशी खेळ समाविष्ट असलेले फिरोदिया करंडकाच्या स्वरूपात केलेला कलाविष्कार प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. कोरोनाची बंधने पाळून हा कार्यक्रम न्यू जर्सीमध्ये ‘मल्लखांब फेडरेशन यू.एस्.ए.’ आणि ‘इंडियन कॉन्सुलेट’ (भारतीय दूतावासाने) यांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित केला होता. अल्प वेळेत उभी राहिलेली ही कलाकृती हे आश्चर्य आहे. ३ पूर्ण तालमी आणि प्रतिदिन केलेले झूम अन् व्हॉट्सअॅप कॉल्स यांनी हे नाटक उभे राहिले. मल्लखांब संघटनेशी संलग्न असलेले श्री. उपेंद्र वाटवे यांनी कार्यक्रमाची कल्पना DARHCT च्या टीमला दिली होती. संकल्पना आणि संहितालेखन गौतम नाईक अन् प्राजक्ता दीक्षित यांनी केले. संयोजनात दुर्गेश जोशी, किरण परांजपे आणि मुकुंद आवटी यांनी हातभार लावला.
भारताचे कॉऊन्सेल जनरल रणधीर जैस्वाल यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. ‘मल्लखांब फेडेरेशन ऑफ यू.एस्.ए.’चे चिन्मय पाटणकर आणि कुटुंबीय, राहुल जोशी, महेश वाणी, नीरज नरगुंड यांनी, तसेच राज्याचे मंत्री आणि सन्माननीय अतिथी यांनी स्वतः किंवा ‘ऑनलाईन’ उपस्थिती लावली. न्यू जर्सी येथील मल्लखांब संघानी डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके केली. अमेरिकेतील हिमवादळाला न जुमानता कनेक्टिकटहून २-३ घंटे प्रवास करून मावळ्यांनी न्यू जर्सीचा गड जिंकला आणि उपस्थित अन् ‘लाईव्ह वेबकास्टिंग’द्वारे प्रेक्षकांची मनेसुद्धा !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता