(म्हणे) ‘गेल्या १ सहस्र २०० वर्षांपासून बंगालमध्ये गोहत्या होत असतांना ती कुणीही रोखू शकत नाही !’

बंगालचे धर्मांध मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी हे हेतूपुरस्सर असे वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. केंद्रसरकारने संपूर्ण देशात गोहत्याबंदी केली, तरच सिद्दीकुल्लाह यांच्यासारखे धर्मांध वठणीवर येतील !

शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी आयोजित काँग्रेसच्या ‘जन आक्रोश सभे’त हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य

काँग्रेसची ‘जन आक्रोश सभा’ ! मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य ! या वेळी मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि त्यांच्यासमोर हे नृत्य चालू होते. काँग्रेसला शेतकर्‍यांविषयी किती प्रेम आहे, हे स्पष्ट होते !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरण बांधू देऊ इच्छिणार्‍या चीनचा कावा न ओळखता ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ असे म्हणणार्‍यांची कीव करावी, ती थोडीच !’ – परात्पर गुरु) डॉ. आठवले    

अमेरिकेकडून कृषी कायद्यांचे समर्थन; मात्र इंटरनेटवरील बंदीस विरोध

अमेरिकेच्या सरकारने भारत सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांविषयी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करत त्याचे समर्थन केले आहे.

सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदारांना आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना भेटण्यापासून गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोखले !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार देहलीच्या गाझीपूर सीमेवर शेतकर्‍यांना भेटण्यासाठी पोचले असता त्यांना देहली पोलिसांनी सीमेवरच अडवले.

देहलीऐवजी चीनच्या सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीनने घुसखोरी केली नसती ! – संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. त्यांच्या लढ्याला बळ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.