संतपदाची जाणीव न ठेवता साधकांशी सहजतेने जवळीक साधणार्‍या पू. (सौ.) भावना शिंदे !

‘पू. भावनाताई म्हणजे राधाच आहेत’, असे वाटते. त्यांच्या पैजणांतील घुगरांचा नाद मंजुळ आहे. अन्य साधिकांच्या पायांतील पैंजणांच्या नादापेक्षा हा नाद वेगळा आहे. मला त्यांच्या पैजणांतील घुगरांचा नाद पुनःपुन्हा ऐकावासा वाटतो.

शूर साधकांनो, ‘विजय आपलाच आहे’, याची निश्‍चिती बाळगा !

‘पूर्वी मी पुष्कळ निराशावादी होतो. बर्‍याचदा ‘वाईट शक्ती पुष्कळ बलवान अन् शक्तीशाली आहेत. त्यामुळे त्यांचाच विजय होईल’, असे मला वाटायचे. ‘मी सामर्थ्यवान नसल्याने त्यांच्याविरुद्ध लढू शकणार नाही’, या विचाराने मला भीती वाटत असे.

पू. देयान ग्लेश्‍चिच (वय ४४ वर्षे) संतपदी विराजमान झाल्यासंदर्भात कु. मधुरा भोसले यांना मिळालेली पूर्वसूचना !

‘काही मासांपासून श्री. देयान ग्लेश्‍चिच यांच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्‍या ‘अनुभूती, मनाचे झालेले चिंतन आणि शिकायला मिळालेली सूत्रे’, या लेखांचे वाचन करतांना माझ्या मनाला पुष्कळ प्रमाणात आनंद अन् अंतर्मुखता अनुभवण्यास येत होती.

पू. देयान ग्लेश्‍चिच यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विष्णुतत्त्व जागृती सोहळ्या’च्या शेवटी श्री. देयानदादांना ‘काय जाणवले ?’, हे उभे राहून सांगायला सांगितले. ते सांगत असतांना ‘त्यांचा अहं आणि ‘स्व’ची जाणीव अत्यंत न्यून असून ते भावावस्थेत आहेत’, असे मला जाणवले.

सद्गुरु सिरियाक वाले यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

‘मला अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी युरोपला जायचे होते. २७.४.२०१९ या दिवशी मला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी साधनेसंदर्भात बोलायचे होते; म्हणून मी त्यांच्याकडे बोलायला गेलो.

सेवा आपोआप होत असल्यासंदर्भात एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. रिशिता गडोया यांना आलेल्या अनुभूती !

अलीकडे ‘मी सेवा करतच नाही. त्या आपोआप पूर्ण होत आहेत’, असे मला अनुभवायला येते. एकदा मी रुग्णाइत होते. मला थोडे बरे वाटल्यावर मी आश्रमात सेवेसाठी गेले. तेव्हा ‘दिवसभरात मी काहीच सेवा केली नाही’, असे मला वाटत होते;

अध्यात्माच्या नावावर लोकांना अयोग्य मार्गदर्शन करून त्यांची दिशाभूल करणार्‍या विदेशांतील काही आध्यात्मिक संघटना

एस्.एस्.आर्.एफ्. सध्या विविध प्रदर्शनांमध्ये (फेअर्समध्ये) सहभागी होत असून तेथे प्रवचने आयोजित करत आहे. अभ्यास करण्याच्या हेतूने तेथील इतर आध्यात्मिक संघटनांनी आयोजित केलेल्या व्याख्यानांना आम्ही उपस्थित राहत होतो.