वर्ष २०२० आणि २०२१ चे ‘लोक हिंद गौरव’ पुरस्कार घोषित

शहापूर येथे आज पुरस्कार वितरण सोहळा

  कल्याण, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त, तसेच साप्ताहिक शिवमार्ग आणि लोक हिंद वृत्तवाहिनीच्या वतीने प्रतीवर्षी राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना राज्यस्तरीय ‘लोक हिंद गौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते. वर्ष २०२० आणि २०२१ चे ‘लोक हिंद गौरव पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. २७ फेब्रुवारी या दिवशी शहापूर येथील कुमार गार्डन सभागृह येथे सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार असून दोन्ही वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येणार आहेत.

‘लोक हिंद गौरव पुरस्कार’ घोषित झालेले मान्यवर

क्षेत्र टाकेश्‍वर यांना संत गाडगेबाबा स्मृती धर्मसेवा लोक हिंद गौरव पुरस्कार, डी वाय फाउंडेशन यांना राजीव गांधी स्मृती सेवाभावी संस्था लोक हिंद गौरव, पांडुरंग बरोरा (माजी आमदार) यांना साबीरभाई शेख स्मृती लक्षवेधी नेता लोक हिंद गौरव, मोनिका ताई पानवे यांना ताराराणी स्मृती रणरागिणी लोक हिंद गौरव, विजय बाळाराम पाटील यांना दि.बा. पाटील स्मृती ज्ञातीसेवा लोक हिंद गौरव, रश्मीताई रविकांत निमसे यांना रमाबाई रानडे स्मृती स्त्री सन्मान लोक हिंद गौरव, विजय सदाशिव घोगरे यांना गो. रा. खैरनार स्मृती प्रशासन क्रांती लोक हिंद गौरव, कु. प्रियांका अशोक विशे यांना इंदिरा गांधी स्मृती प्रशासन प्रेरणा लोक हिंद गौरव, गणपत विशे यांना शामराव पेजे स्मृती समाजसंघटक लोक हिंद गौरव, ह.भ.प. गुरुराज इनामदार यांना नरेंद्र दाभोळकर स्मृती समाजसुधारक लोक हिंद गौरव, आशुतोष लक्ष्मण घरत यांना बाळासाहेब माटे स्मृती उद्योजक प्रेरणा लोक हिंद गौरव, सुमेध भवार यांना बाबासाहेब आंबेडकर स्मृती जननायक लोक हिंद गौरव, डॉ. गजानन पाटील यांना डॉ. नितु मांडके स्मृती आरोग्य सेवा लोक हिंद गौरव, दर्शन विजय ठाकूर यांना संत तुकाराम महाराज स्मृती वनसंवर्धन लोक हिंद गौरव, डॉ. कल्पेश तारमळे यांंना डॉ. भाऊ लाड स्मृती आरोग्य सेवा लोक हिंद गौरव, संग्राम तोगरे पाटील यांंना नाना शंकर शेठ स्मृती जनसेवा लोक हिंद गौरव, प्रकाश म्हात्रे यांंना स्वामी स्वरूपानंद स्मृती अध्यात्म सेवा लोक हिंद गौरव, विजय पाटील यांंना बाबा आमटे स्मृती आरोग्यदूत लोक हिंद गौरव, दशरथ हरड यांंना स्व. विठ्ठलराव खाडे स्मृती लोक सेवा लोक हिंद गौरव, अल्पेश भोपी यांंना म. फुले स्मृती समाजरत्न लोक हिंद गौरव, एकनाथ देसले यांंना विजय तेंडुलकर स्मृती नाट्यप्रेरणा लोक हिंद गौरव, सुनील साठे यांंना आनंद दिघे स्मृती लक्षवेधी युवा नेता लोक हिंद गौरव, प्रा. गोपाळ वेखंडे यांंना कवी शंकर बडे स्मृती साहित्यसेवा लोक हिंद गौरव, सुजाता पाटणकर यांंना गजानन बुवा पाटील स्मृती भजन रत्न लोक हिंद गौरव, गोविंद धिर्डे यांंना स्वातंत्र्यसैनिक किसनबाबा भेरे स्मृती ज्ञातीसेवा लोक हिंद गौरव, अविनाश कटकवार यांंना राजीव गांधी स्मृती लक्षवेधी प्रशासक लोक हिंद गौरव, सुधीर भोईर यांंना साने गुरुजी स्मृती प्रयोगशील शिक्षक लोक हिंद गौरव, गुरुनाथ सांबरे यांंना शांतारामभाऊ घोलप स्मृती कृषी रत्न लोक हिंद गौरव, सारिका शिंदे यांंना तानुबाई बिर्जे स्मृती लक्षवेधी पत्रकारिता लोक हिंद गौरव, दीपक कडव यांंना डॉ. दत्ता सामंत स्मृती उद्योजक प्रेरणा लोक हिंद गौरव, संतोष निचिते यांंना राजर्षी शाहू महाराज स्मृती शिक्षण सेवा लोक हिंद गौरव, निलेश पाटील यांंना शहिद  भगतसिंग स्मृती देशसेवा लोक हिंद गौरव, नीलकंठ व्यापारी यांंना स्व. अब्दुल कलाम स्मृती शिक्षक प्रेरणा लोक हिंद गौरव, राजू शांताराम पाटील यांंना क्रांतिसिंह नाना पाटील स्मृती उत्कृष्ट रक्षक लोक हिंद गौरव, हरिश्‍चंद्र तुकाराम भोईर यांंना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती गुणवंत शिक्षक लोक हिंद गौरव, दिलीप कराळे यांंना अण्णासाहेब पाटील स्मृती कामगार सेवा लोक हिंद गौरव, तुकाराम बांगर यांंना शहीद हेमंत करकरे स्मृती शौर्य प्रेरणा लोक हिंद गौरव, अशोक  घोलप यांंना प.पू. रिद्धीनाथबाबा स्मृती गुणवंत वारकरी लोक हिंद गौरव, विलास गगे यांंना स्व. सोनुभाऊ बसवंत स्मृती समाज रत्न लोक हिंद गौरव, रवींद्र पष्टे यांंना कर्मवीर भाऊराव पाटील स्मृती लक्षवेधी शिक्षक लोक हिंद गौरव, भगवान मोकाशी यांंना स्व. पा. शि. देशमुख स्मृती कृतीशील लोकप्रतिनिधी लोक हिंद गौरव, अशोक वीर यांंना भाई भोपतराव स्मृती लक्षवेधी सरपंच लोक हिंद गौरव, प्रभाकर थोरात यांंना शाहीर वामनदादा कर्डक स्मृती संविधान जागर लोक हिंद गौरव, अपर्णा देवेन्द्र भेरे यांंना सावित्रीबाई फुले स्मृती ज्ञानज्योती लोक हिंद गौरव, भरत दळवी यांंना संत तुकडोजी महाराज स्मृती युवा प्रबोधनकार लोक हिंद गौरव, जनसेवा एकात्मिक संस्था यांंना बिरसा मुंडा स्मृती आदिवासी प्रेरणा लोक हिंद गौरव, प्रदीप मोगरे यांंना बाबा आमटे स्मृती रुग्णमित्र लोक हिंद गौरव, विजय सूर्यवंशी यांंना लोककवी अण्णाभाऊ साठे स्मृती लक्षवेधी साहित्यिक लोक हिंद गौरव, राजकुमार कडव यांंना महर्षी कर्वे स्मृती शिक्षक रत्न लोक हिंद गौरव, खंडूजी चौधरी यांंना शंकरराव झुंजारराव स्मृती लक्षवेधी उद्योजक लोक हिंद गौरव आणि विनायक मुरेकर यांंना पुंडलिकराव लहाने स्मृती आरोग्य रक्षक लोक हिंद गौरव या ५२ जणांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

हे पुरस्कार लोक हिंद वृत्तवाहिनीचे संपादक महेश धानके, कार्यकारी संपादक लक्ष्मण घरत आणि निवड समिती प्रमुख किसन बोन्द्रे यांनी घोषित केले आहेत, असे सहसंपादक जगदीश पताळे, उपसंपादक अंकुश भोईर, पत्रकार संघाचे शहापूर तालुक्याचे अध्यक्ष जितेंद्र भानुशाली आणि शहर प्रतिनिधी सुनील महाजन यांनी कळवले आहे.