शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी आयोजित काँग्रेसच्या ‘जन आक्रोश सभे’त हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य

काँग्रेसला शेतकर्‍यांविषयी किती प्रेम आहे, हे यातून स्पष्ट होते !


रांची (झारखंड) – राज्यातील सरायकेला-खरसावा जिल्ह्यात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसकडून ‘जन आक्रोश सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य करण्यात आले. येथील कुकडू हाट मैदानात पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाकडून या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि त्यांच्यासमोर हे नृत्य चालू होते.

सामाजिक माध्यमांतून या घटनेचा व्हिडिओ प्रसारित होत आहे. या घटनेवरून भाजपने काँग्रेसवर टीका करतांना काँग्रेसला शेतकर्‍यांविषयी खोटे प्रेम असल्याचा आरोप केला.