नेवासे (जिल्हा नगर) येथे कहार समाज सेवा ट्रस्टच्या वतीने ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन

नेवासे येथील ‘हळदी-कुंकू’ समारंभाला उपस्थित महिला

नेवासे (जिल्हा नगर), २८ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील मुंबादेवी मंदिरात शिवजयंती आणि रथसप्तमी यांनिमित्ताने श्री. संतोष (भाऊ) पंडुरे यांच्या पुढाकाराने कहार समाज सेवा ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचे सामाजिक प्रश्‍न समजून घेणे आणि त्या समस्यांचे निराकरण करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमाला कहार समाजातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या कार्यक्रमात प्रारंभी श्री गणेश आणि समाजाचे कुलदैवत मुंबादेवी यांची आरती करण्यात आली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.

१. कहार समाजातील कृतीशील महिला श्रीमती संगिता कुंढारे आणि श्रीमती भारती गव्हाणे यांनी घरोघरी जाऊन या कार्यक्रमाचे महिलांना निमंत्रण दिले, तर कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांचे सौ. भारती गव्हाणे, कु. कविता पंडुरे, सौ. सुमन जिरे, सौ. अनिता लहिरे, सौ. अनिता पंडुरे यांनी स्वागत केले.

२. या वेळी कु. कविता पंडुरे यांनी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गौरवपर भाषणेही करण्यात आली. या वेळी कु. गायत्री भंडारे यांनी महाराजांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत ‘त्या काळी स्त्रियांना मिळणारी सन्मानपूर्वक वागणूक’ यावर भाष्य केले, तसेच अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.

३. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती संगिता कुंढारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कहार समाज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संतोष (भाऊ) पंडुरे, श्री. ज्ञानेश्‍वर पंडुरे, श्री. आकाश गव्हाणे, श्री. कुणाल सरगैय्ये, श्री. गणेश गव्हाणे, तसेच मोहिनीराज सरगैय्ये यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विजया सरगैय्ये यांनी केले.

क्षणचित्रे

१. या वेळी सनातन संस्थेचे उत्पादन मेण आणि कुंकू वाण म्हणून उपस्थित महिलांना देण्यात आले.

२. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षण वर्गात सहभागी होणार्‍या कु. कविता पंडुरे, कु. गायत्री भंडारे यांनी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या महिला आणि युवती यांना ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून स्वरक्षण प्रशिक्षण सहभागी होण्याचे आवाहन केले, तर ‘महिलांनी कपाळाला कुंकू का लावावे’ याविषयी शास्त्रोक्त माहिती कु. वर्षा पंडुरे यांनी महिलांना दिली.