भरतमुनी यांच्या जयंतीच्या निमित्ताने २७ फेब्रुवारीला विविध कार्यक्रम

सांगली, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे संस्कार भारती सांगली यांच्या वतीने २७ फेब्रुवारी या दिवशी आद्य नाट्यशास्त्रकार भरतमुनी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सौ. साधना कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्या यांचे ‘नृत्याविष्कार’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच दिवशी मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महिला वाचकांसाठी ‘शब्दगंध वाचनप्रेमी समूह’चा शुभारंभ होत आहे. हे दोन्ही कार्यक्रम विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालय येथे सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत होणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कार भारतीचे अध्यक्ष श्री. माधव वैशपांयन, सचिव सौ. सविता कुलकर्णी, कार्यक्रम प्रमुख सौ. कल्याणी गाडगीळ यांनी केले आहे.