प्रयागराज कुंभपर्व २०२५
प्रयागराज : येथील महाकुंभपर्वाच्या निमित्ताने सरकारने नव्याने चालू केलेल्या https://kumbh.gov.in या संकेतस्थळाला ४ जानेवारीपर्यंत १८३ देशांतील ३३ लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली.
🌎 Global Interest in #Mahakumbh2025 ! 🕉️
33 lakh users from 183 countries have visited the Mahakumbh website. 📊
India 🇮🇳 tops the list, followed by USA 🇺🇸, UK 🇬🇧, Canada 🇨🇦, and Germany. 🇩🇪
जय श्री राम l महाकुंभ l प्रयागराज l कुंभ मेला #SanatanPrabhatAtKumbh pic.twitter.com/P8UEQ94nUA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 8, 2025
भेट देणारे हे लोक जगभरातील ६ सहस्र २०० शहरांतील होते. या संकेतस्थळाला भेट देणार्यांमध्ये अर्थात् भारतीय अग्रक्रमावर असून त्यापाठोपाठ अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि जर्मनी या देशांतील लोकांचा क्रमांक आहे. ६ ऑक्टोबर २०२४ या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले होते.