महाराष्ट्रात ४ सहस्र शाळा अनधिकृत ! – संजयराव तायडे पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल्स ट्रस्टीज असोसिएशन

२१ एप्रिलला बैठकीचे आयोजन

मुंबई – राज्यभरात सुमारे ४ सहस्र अनधिकृत शाळा कार्यरत आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र इंग्लिश स्कूल्स ट्रस्टीज असोसिएशन’चे (‘मेस्टा’चे) अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी दिली.

संजयराव तायडे पाटील

ते म्हणाले,…

१. अनेकदा अपील करूनही सरकार या संस्थांविरुद्ध पुरेशी कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे.

२. ठाणे महानगरपालिकेने ठाणे जिल्ह्यातील ८१ अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या. महापालिकेने चांगली कारवाई केली.

३. आम्ही सरकारला सूचना देण्यासाठी आणि विविध लेखी पत्रव्यवहारांद्वारे कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले; परंतु अद्यापपर्यंत कोणतेही ठोस उपाय केले गेले नाहीत.

४. ‘मेस्टा’ने २१ एप्रिल या दिवशी इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा करण्यासाठी राज्यव्यापी बैठक आयोजित केली आहे. त्यात मान्यता नसलेल्या संस्थांमध्ये होणारी वाढ हा प्रमुख चर्चेचा विषय आहे.

मेस्टाच्या ठाणे युनिटचे अध्यक्ष उत्तम सावंत यांनी आवाहन केले की, सध्या या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि कायदेशीर शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी त्यांना त्वरित मान्यताप्राप्त शाळांमध्ये स्थानांतरित केले जावे.