मंड्या (कर्नाटक) – ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास नकार देणारी पत्नी आणि सासू यांच्यावर पतीने प्राणघातक आक्रमण केल्याची घटना मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टणा येथे नुकतीच घडली. या प्रकरणी पती श्रीकांत यांच्यासह ९ जणांच्या विरोधात श्रीरंगपट्टणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (विविध आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करून हिंदु कुटुंबांमध्ये फूट पाडणारे ख्रिस्ती पोलिसांना दिसत नाही का ? – संपादक)
पत्नी लक्ष्मी आणि सासू श्रुती या दोघांवरही पती श्रीकांत यांच्यासह अनेक जण धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होते. या दोघांनी याला नकार दिल्यावर त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.