कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात तालिबानी कृत्य
दावणगेरे (कर्नाटक) – येथे जमील अहमद उपाख्य शमीर याने त्याच्या पत्नीच्या विरोधात मशिदीत जाऊन तक्रार केल्यानंतर पत्नी शबीना बानू (वय ३८ वर्षे) हिला मशिदीबाहेर दांडे, पाईप आदींद्वारे मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. ही घटना ९ एप्रिल या दिवशी घडल्याचे सांगितले जात आहे.

७ एप्रिल या दिवशी पीडित शबीना बानू हिच्या घरी तिचे नातेवाईक नसरीन आणि फयाज आले होते. यानंतर ती त्यांच्यासोबत फिरायला गेली होती. पती अहमद याला हे आवडले नाही आणि तो संतापला आणि त्याने त्याची पत्नी नसरीन आणि फयाज यांच्याविरुद्ध मशिदीत तक्रार केली. ९ एप्रिल या दिवशी तिघांना मशिदीत बोलावण्यात आले. जेव्हा ते मशिदीजवळ पोचले, तेव्हा ६ जणांच्या गटाने शबीनाला मारहाण केली. तिच्यावर दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी ६ जणांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाअफगाणिस्तानमध्ये ज्या घटना घडतात, त्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष देशात घडत आहेत, हे लज्जास्पद ! याविषयी निधर्मीवादी तोंड का उघडत नाहीत ? महिलांची काळजी घेत असल्याचे दाखवणार्या सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा गप्प का आहेत ? |