समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांचे संतापजनक विधान !

आगरा (उत्तरप्रदेश) – जर तुम्ही म्हणता की, ‘प्रत्येक मशिदीखाली एक मंदिर आहे’, तर आपल्याला असे म्हणावे लागेल की, ‘प्रत्येक मंदिराखाली एक बौद्ध मठ आहे.’ जुन्या कबरी खोदू नका, नाहीतर ते महागात पडेल. (रामजी सुमन यांची वैचारिक सुंता झाल्यानेच ते असे विधान करत आहेत, हे वेगळे सांगायला नको ! – संपादक) जर हे लोक म्हणतात की ‘मुसलमानांमध्ये बाबरचा ‘डीएन्ए’ ( डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक. जनुकीय घटक (जेनेटिक मटेरियल) ज्यापासून बनतात, ते रेणू म्हणजे डी.एन्.ए.) आहे’, तर आम्ही तुम्हाला विचारू की, ‘तुमच्यामध्ये कुणाचा ‘डीएन्ए’ आहे ?’, ते सांगा, असा प्रश्न येथील सुमन त्यांनी उपस्थित केला. (हिंदूंमध्ये भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज आदींचा डीएन्ए आहे, हे सुमन यांनी कायमचे लक्षात ठेवावे ! – संपादक) ते येथे समाजवादी पक्षाच्या कार्यालयात आयोजित डॉ. भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते. सुमन यांनी यापूर्वी राज्यसभेत बोलतांना ‘सम्राट राणा सांगा याने बाबरला भारतात आणले होते’, असे विधान करत हिंदूंना ‘गद्दार’ म्हटले होते. त्यावरून करणी सेनेने त्यांच्या निवासस्थानावर आक्रमण करत तोडफोड केली होती.
रामजी लाल सुमन पुढे म्हणाले की, आतापर्यंत आपण भूदल, नौदल आणि वायूदल यांच्याविषयी ऐकले होते; पण ही बनावट करणी सेना कुठून आली ?, अशी टीकाही त्यांनी केली.
संपादकीय भूमिकातोंड आहे म्हणून काहीही बरळणारे समाजवादी पक्षाचे खासदार ! अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबल्यावर त्यांना काय बोलायचे आणि काय नाही ?, याची थोडीतरी समज येईल ! |