Suvendu Adhikari BJP MLA :  हिंदूंवर अत्याचार झाले, तर आम्ही गप्प बसणार नाही !

सुवेंदू अधिकारी

कोलकाता (बंगाल) – बंगालची स्थिती चांगली नाही. ममता बॅनर्जी यांच्या राज्यातील पोलीस तृणमूल काँग्रेसचा एक गट बनले आहेत. जर हिंदूंवर अत्याचार होत रहाणार असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही हिंदू आणि आदिवासी यांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत, असे विधान भाजपचे आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केले आहे.

मुर्शिदाबाद दंगलीसाठी तुर्कीयेहून पैसे आल्याचा संशय !

मुर्शिदाबाद दंगल

मुर्शिदाबादमधील दंगलीचा कट ३ मासांपूर्वीच कट रचण्यात आला, अशी माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या दंगलींना तुर्कीयेकडून निधी देण्यात आला होता. मुसलमान दंगलखोरांना लूटमार आणि हिंसाचार यांसाठी प्रति व्यक्ती ५०० रुपये देण्यात आले होते. ही दंगल श्रीरामनवमीला होणार होती; पण सुरक्षेच्या कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली आणि वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ ती करण्यात आली.

मुर्शिदाबाद येथील दंगलीमागे बांगलादेशी घुसखोर

मुर्शिदाबाद दंगल

मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या प्रारंभीच्या अन्वेषणाची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला देण्यात आली आहे. या हिंसाचारामागे बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्याचे प्राथमिक अन्वेषणात उघड झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (देशात ५ कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत, असे म्हटले जात आहे. उद्या या सर्वांनी उठाव केला, तर देशात काय होणार, याची ही झलक म्हणायची का ? – संपादक) गृह मंत्रालयाच्या उच्च अधिकार्‍यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहसचिव हे बंगालचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्या संपर्कात आहेत.

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आले आहेत, होत आहेत आणि पुढेही होत रहाणार आहेत, अशीच सध्याची स्थिती असल्याने आणखी काय होण्याची वाट पाहिली जाणार आहे ?