Prayagraj Kumbh Parva 2025 : सनातन संस्थेच्या सेक्टर ९ येथील प्रदर्शनकक्षाला यू ट्यूबर्सकडून प्रसिद्धी !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

सनातन संस्थेचा सेक्टर ९ येथील प्रदर्शनकक्ष

प्रयागराज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातन संस्थेच्या सेक्टर ९ येथील प्रदर्शनकक्षाला यु ट्युबरकडून (यू ट्यूबर्स म्हणजे यू ट्यूबवर स्वतःची वाहिनी चालवणारे) प्रसिद्धी देण्यात आली आहे. यामध्ये शिवा राफेल, दिव्यांशु अवस्थी यांचा समावेश आहे. शिवा राफेल नावाच्या यू ट्यूबरने समितीच्या साधकाचे फलकाची माहिती सांगतांना पूर्ण चित्रीकरण करून ते त्याच्या यू ट्यूबरवर प्रसिद्ध केले.

(Shiva Rafale)

सनातन संस्थेच्या फलक प्रदर्शनात भाविकांकडून जयघोष !

सनातन संस्थेच्या फलक प्रदर्शन पहाणार्‍या भाविकांकडून प्रदर्शनकक्षात ठेवलेल्या सनातन संस्था निर्मित श्री गणेशाच्या सात्त्विक मूर्तीसमोर देवतांच्या नावांचा जयघोष केला.