वणी (यवतमाळ) येथे गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी

येथील भाजप-सेना युतीचे उमेदवार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारासाठी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १८ ऑक्टोबर या दिवशी वणीत आले आणि युतीच्या उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन केले.

परळी (बीड), खारघर (नवी मुंबई) आणि सातारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा

आपल्या देशावर महादेवाची कृपा आहे. सोमनाथपासून वैजनाथपर्यंत मला आशीर्वाद मिळाला आहे. यंदा मागील सर्व विक्रम मोडीत निघतील, अशी परिस्थिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नेते पक्ष सोडून का जात आहेत ? जे राहिले, ते हताश आहेत.

काश्मीरसाठी बलीदान देणारे सैनिक असलेल्या महाराष्ट्राचा ‘कलम ३७०’शी संबंध कसा नाही ? – पंतप्रधान मोदी

महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा नसेल, जिथल्या सैनिकांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलीदान दिले नाही. मग याच शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७० चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही ?

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूने आक्रमण

हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या खासदारावर झालेले आक्रमण चिंताजनक ! जिथे लोकप्रतिनिधीच असुरक्षित असतील, तिथे सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार ?

महाराष्ट्रातील जनता नेहमी भगव्यावर प्रेम करते ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

युती सरकारने गेल्या पाच वर्षांत जी कामे केली, त्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. शिवसेनाप्रमुखांमुळेच भगवे धुमारे महाराष्ट्रात निर्माण झाले. महाराष्ट्रातील जनता नेहमी भगव्यावर प्रेम करते.


Multi Language |Offline reading | PDF