Hafizul Hasan Ansari On Sharia : (म्हणे) ‘मुसलमानांसाठी प्रथम शरीयत, नंतर राज्यघटना !’

झारखंडमधील काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे मंत्री हाफिजुल हसन अन्सारी यांचे डॉ. आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात विधान

हाफिजुल हसन अन्सारी

रांची (झारखंड) – प्रथम आपण शरीयतला धरून राहू, नंतर राज्यघटनेला. इस्लाममध्ये शरीयत महत्त्वाचा आहे. आपण कुराण आपल्या हृदयात आणि राज्यघटना हातात ठेवतो, असे विधान काँग्रेसचे आमदार आणि झारखंडचे क्रीडा, युवा व्यवहार अन् अल्पसंख्याक कल्याण मंत्री हाफिजुल हसन अन्सारी यांनी केले. ते १४ एप्रिलला डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते.

झारखंड राज्य भाजपने अन्सारी यांच्या विधानावर म्हटले आहे की, ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांची दारे उघडी आहेत. भारत केवळ डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या राज्यघटनेवर चालेल आणि ती सर्वोच्च राहील.

शरीयत (प्रतिकात्मक चित्र)

संपादकीय भूमिका

  • डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनीच निर्माण केलेल्या राज्यघटनेचा असा अवमान आंबेडकरप्रेमींना मान्य आहे का ?
  • काँग्रेसचे नेते राहुल गांधी हातात राज्यघटनेची प्रत घेऊन ते तिचे रक्षण करत असल्याचे सतत सांगत असतात; मात्र त्यांचे मुसलमान आमदार या उलट बोलत आहेत, यावर राहुल गांधी बोलतील का ?
  • मुसलमानांसाठी त्यांचा धर्म सर्वप्रथम आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले. याविषयी निधर्मीवादी बोलणार नाहीत; कारण निधर्मीवाद केवळ हिंदूंसाठी आहे !