Benefits Of Hanuman Chalisa : प्रतिदिन हनुमानचालिसाचे पठण केल्याने हृदयविकाराचा झटका टाळणे शक्य ! – संशोधनाचा निष्कर्ष

नवी देहली – हनुमानचालिसाच्या पठणामुळे आध्यात्मिक लाभ होतात, हे गेली अनेक शतके हिंदू अनुभव घेत आहेत. आता विज्ञानालाही संशोधनाच्या आधारे याचे विविध लाभ होत आहे, असे आढळले आहे. या संदर्भात अनेक प्रयोगही झाले आहेत. ‘जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन’मधील एका अभ्यासानुसार प्रतिदिन हनुमानचालिसाचे पठण केल्याने ताण न्यून होतो आणि सकारात्मक उर्जेची पातळी वाढते, तसेच हृदयविकाराचा झटका टाळता येईल.

मन आणि मेंदू यांना शांती मिळते !

हनुमानचालिसामध्ये अनुमाने ४० श्लोक आहेत. त्यांपैकी बहुतेक अनुष्टुप छंदामध्ये लिहिलेले आहेत. म्हणजेच ते लयबद्ध, पुनरावृत्ती करणारे आणि ध्यान लावणारे आहेत. हे श्लोक मेंदूची वारंवारता बीटा लहरींवरून अल्फा लहरींमध्ये पालटतात, ज्यामुळे माणसाचे मन आणि मेंदू यांना शांती मिळते.

शरिराची शांती राखणारी प्रणाली सक्रीय होते !

जेव्हा आपण यातील ‘रामदूत अतुलित बलधामा..’सारखे श्लोक नियमितपणे म्हणतो, तेव्हा त्याचे ध्वनीकंपन आपल्या शरिरातील ‘कॉर्टिसोल’ म्हणजेच ताण संप्रेरक न्यून करते आणि ‘सेरोटोनिन – डोपामाइन’ वाढवते. यामुळे आपल्या शरिराची शांती राखणारी प्रणाली आणि ‘पॅरासिम्पेथेटिक’ प्रणाली सक्रीय होते.

हृदयविकाराचा झटका येत नाही आणि इतर आजार होत नाहीत !

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएम्आर् – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिसीन रिसर्च) आणि ‘एम्स’च्या (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या) संशोधनानुसार प्रतिदिन १० मिनिटे हनुमानचालिसाचे पठण केल्याने हृदयाचे ठोके न्यून  होण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि झोप लागण्यास साहाय्य होते. हे ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’, चिंता आणि ‘एडीएचडी’ (अटेन्शन डेफिसीट हायपरॲक्टव्हीटी डिसऑर्डर) विकारांपासून देखील आराम देते.

रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त !

‘जर्नल ऑफ इव्होल्यूशन ऑफ मेडिकल अँड डेंटल सायन्सेस’मधील नीरा गोयल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या संशोधनानुसार १८ ते २२ वर्षे वयोगटातील  एमबीबीएसच्या (‘बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी’च्या) २० विद्यार्थ्यांना १० मिनिटे हनुमानचालिसा ऐकवण्यात आल्यानंतर त्यांचा रक्तदाब न्यून झाल्याचे आढळून आले.नीरा गोयल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेले संशोधन –

नीरा गोयल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेले संशोधन –

संपादकीय भूमिका

‘अन्य धर्मियांना ठार मारा, त्यांचे धर्मांतर करा, त्यांची संपत्ती लुटा’ अशी शिकवण देणार्‍या अन्य पंथांमध्ये असे एकतरी स्तोत्र आहे का ?