Bengal-Bhangar Violence : हिंसाचारामागे दर्गाचा प्रमुख अब्बास सिद्दीकी आणि त्याचा इंडियन सेक्युलर फ्रंट पक्षाचा आमदार असणारा भाऊ नौशाद सिद्दीकी यांचा हात !

मुर्शिदाबाद नंतर दक्षिण २४ परगणा येथील भांगरमध्ये मुसलमानांचा हिंसाचार

अब्बास सिद्दीकी आणि त्याचा भाऊ नौशाद सिद्दीकी

कोलकाता (बंगाल) – मुर्शिदाबादनंतर बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर येथे १४ एप्रिलला सायंकाळी मुसलमानांनी हिंसाचार करत जाळपोळ केली. या वेळी हिंदू आणि पोलीस दोघांवरही आक्रमण करण्यात आले. अनेक वाहनांना आग लावण्यात आली. येथे वक्फ कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असतांना मुसलमानांनी हा हिंसाचार केला. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत २ जणांना अटक केली आहे. या हिंसाचारामागे फुरफुरा शरीफ दर्गाचा प्रमुख पिरजादा अब्बास सिद्दीकी आणि त्याचा भाऊ असलेला इंडियन सेक्युलर फ्रंट आमदार नौशाद सिद्दीकी यांचा हात असल्याचे समोर येत आहे.

१. पोलीस सूत्रांचे आणि स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, अब्बास सिद्दीकी आणि त्याचा पक्ष इंडियन सेक्युलर फ्रंटने हिंसाचाराच्या आगीत तेल ओतले. सिद्दीकीने स्वतः मुसलमानांना वक्फ कायद्याविरुद्ध भडकावले होते, ज्यामुळे येथे हिंसाचार झाला. येथे आंदोलन करण्यात येत होते त्याचे नेतृत्व आमदार नौशाद सिद्दीकी यांनी केले होते. स्थानिकांचा असा दावा आहे की, सिद्दीकीने वक्फ कायद्याला ‘मुसलमानांवरील आक्रमण’ असे संबोधून मुसलमानांना भडकावले.

२. फुरफुरा शरीफ दर्ग्याचा पीरजादा अब्बास सिद्दीकी याने ऑक्टोबर २०२१ मध्ये, ‘बांगलादेशातील दुर्गा पूजा मंडपात कुराणची प्रत ठेवणार्‍या लोकांचा शिरच्छेद करावा’, असे विधान केले होते. दुर्गा पूजासारख्या हिंदू सणांमध्ये सहभागी होण्याविषयी सिद्दीकी याने मुसलमानांवर टीका करतांना म्हटले होते की, जर त्यांना अशा सणांमध्ये इतके रस असेल तर त्यांनी इस्लाम सोडावा. (अशी विधाने करणारा कारागृहात का नाही ?, असा प्रश्न हिंदूंनी तृणमूल काँग्रेस सरकारला विचारले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • याविषयी देशातील निधर्मीवादी, धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्ष, संघटना, त्यांचे नेते तोंड उघडणार नाहीत; कारण हिंसाचार करणारे मुसलमान आहेत !
  • हिंदूंनी कधी दंगली घडवून मुसलमानांवर आक्रमण केल्याचे ऐकले आहे का ?