मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अनिल कपूर यांनी पान मसाल्याचे विज्ञापन करण्यास नकार दिला आहे. यासाठी त्यांना १० कोटी रुपये देऊ करण्यात आले होते; पण त्यांनी यासाठी नकार दिला. ‘येणार्या पिढीमध्ये कोणताही चुकीचा संदेश जाईल किंवा माझ्यावर प्रेम करणार्यांच्या आरोग्याची हानी होईल, अशा प्रकारचे कोणतेही विज्ञापन करणार नाही’, असे त्यांनी सांगितले. हा निर्णय घेतल्यासाठी अनेकांनी अनिल कपूर यांचे कौतुक केले आहे.
Kudos to Anil Kapoor! 👏
Declines ₹10 crore paan masala endorsement deal 🚫
✊Joining the league of socially conscious stars: 💫
– Allu Arjun
– R Madhavan
– Yash
– Kartik AaryanPrioritizing public health over profits! ❤️
More power to actors who stand for a cause! 💪… pic.twitter.com/6snQYHaxrM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 22, 2024
याआधी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेते शाहरूख खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांनी गुटखा, तसेच पान मसाले यांची विज्ञापने केल्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाप्रसिद्धीलोलुपता आणि पैशांची हाव यांपेक्षा सामाजिक भान जपणारे असे अभिनेते हवेत ! |