शिवशक्‍ती प्रतिष्‍ठान आयोजित गड-दुर्ग छायाचित्र प्रदर्शन

कोल्‍हापूर येथे शिवशक्‍ती प्रतिष्‍ठानच्‍या वतीने आयोजित दुर्गप्रेमी बळवंत सांगळे यांनी काढलेल्‍या भारतातील गड-दुर्गांच्‍या छायाचित्रांच्‍या प्रदर्शनाचे उद़्‍घाटन छत्रपती शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

सरदार पटेल यांचे जीवनचरित्र समजून घेणे आवश्यक ! – पोलीस अधीक्षक  धनंजय कुलकर्णी

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणार्‍या दुर्मिळ छायाचित्रांचे विभागस्तरीय प्रदर्शन येथील कोकण रेल्वे स्थानकावर आयोजित करण्यात आले आहे.

भारताच्या फाळणीची भीषणता दर्शवणारे मंत्रालयात चित्रप्रदर्शन !

वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या भारतियांच्या नरसंहाराची भीषणता दर्शवणारे चित्रप्रदर्शन महाराष्ट्राच्या मंत्रालयात लावण्यात आले आहे.

कुंकळ्ळी (गोवा) येथे पोर्तुगिजांविरुद्ध लढा दिलेल्या १६ महानायकांना मानवंदना !

श्री शांतादुर्गा सेवा समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्मारकावर जलाभिषेक करून महानायकांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘हिंदु अस्मितेचा आविष्कार’ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

व्यंगचित्रकार श्री. गुरु खिलारे यांच्या ‘मनातील गप्पा’ या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनास प्रारंभ

श्री. गुरु खिलारे हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यंगचित्रे रेखाटत असून त्यांची व्यंगचित्रे दैनिक ‘तरुण भारत’ येथून प्रसिद्ध होत आहेत. तरी अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

‘आंतरराष्‍ट्रीय हॉलोकॉस्‍ट स्‍मृतीदिना’निमित्त मंत्रालयात ज्‍यूंच्‍या नरसंहाराचे छायाचित्र प्रदर्शन !

‘आंतरराष्‍ट्रीय हॉलोकॉस्‍ट (नरसंहार) स्‍मृतीदिना’निमित्त इस्रायलचा वाणिज्‍य दूतावास आणि महाराष्‍ट्राचा पर्यटन विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने नाझी जर्मनीकडून ज्‍यूंच्‍या झालेल्‍या नरसंहाराचे मंत्रालयात छायाचित्र प्रदर्शन लावण्‍यात आले होते.

लुप्त होत असलेल्या औषधी वनस्पतींचे संवर्धन करा ! – जागतिक आयुर्वेद परिषदेत आवाहन

यावर उपाय म्हणून लागवडीचा अभ्यास करणे, त्यासंबंधी शास्त्रोक्त माहितीचा संग्रह करणे, औषधांच्या संवर्धनासाठी आवश्यक कायदे करणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पुणे येथे १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन !

१५ एकर परिसरात हे प्रदर्शन असून यात ५०० हून अधिक आस्थापने, संशोधन संस्था आणि नवीन उद्योजक हे शेतीतील नवीन तंत्रज्ञान अन् उत्पादने सादर करणार आहेत.

पुणे येथे ‘श्री गणेशाची उपासना कशी करावी ?’ आणि क्रांती गाथा प्रदर्शनाचे आयोजन !

विविध सणांच्या काळात  सण-उत्सव आदर्शरित्या कसे साजरे करावेत ? त्यामध्ये होणारे अपप्रकार रोखून संबंधित देवतेची कृपा कशी संपादन करावी ? याविषयी समितीच्या वतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात येते.

कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्याना’स विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ! 

हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे नियोजन करण्यात आले होते.