समाजवादी पक्षाचे आमदार इंद्रजीत सरोज यांचे हास्यास्पद विधान

कौशांबी (उत्तरप्रदेश) – भारतातील मंदिरांमध्ये शक्ती असती, तर महंमद बिन कासिम, महमूद गझनी, महंमद घौरी यांसारखे लुटारू देशात आले नसते. जर कुठे शक्ती असेल, तर ती सत्तेच्या मंदिरात आहे. त्यामुळेच ‘बाबा’ मंदिर सोडून सत्तेच्या मंदिरात विराजमान झाले आहेत. ते हेलिकॉप्टरमधून फिरण्याचे काम करतात, असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार इंद्रजीत सरोज यांनी येथील पक्षाच्या कार्यालयात डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले. ‘श्रीरामनामाचा जप करून काही होणार नाही, उलट ‘जय भीम’ची घोषणा दिली, तर तुम्ही पुढे जाल. या घोषणेमुळे मी ५ वेळा आमदार आणि एकदा मंत्री झालो,’ असेही सरोज या वेळी म्हणाले.
१. आमदार इंद्रजित सरोज यांनी संत तुलसीदास यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले, ‘‘जर कुणी खालच्या जातीमधील व्यक्ती शिकली, तर ती घटना सापाला दूध पाजण्यासारखी असेल’, असे तुलसीदास यांनी श्रीरामचरितमानसमध्ये लिहिले आहे.’’ (अन्य पंथियांच्या पुस्तकांत अन्य धर्मियांना ठार मारा, त्यांचे धर्मांतर करा, त्यांच्या महिलांना कह्यात घ्या, त्यांची प्रार्थनास्थळे तोडा आदी गोष्टी लिहिल्या आहेत आणि ते गेली अनेक शतके आणि आजही अशी कृत्ये करत आहेत, त्याविषयी सरोज का बोलत नाहीत ? – संपादक)
२. आमदार सरोज पुढे असेही म्हणाले की, तुलसीदास यांनी आमच्याविषयी (दलितांविषयी) फार काही लिहिले; मात्र अकबराचे समकालीन असूनही मुसलमानांच्या विरोधात काही लिहिले नाही, कदाचित् त्यांचे धाडस झाले नाही, असाही दावा त्यांनी केला.
संपादकीय भूमिका
|